पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.



2. चंद्राला चांदणी प्रिय होती ऊनाला सावली प्रिय होती ,
पोरका झालेल्या राजाला फ़क्त राणीची कमी होती.



3. तुझ्या प्रत्येक आठवणीने होते माझी रोजची पहाट आणि ,
ओलावतात भावनांनी डोळ्यांचे काठ.



4. काय म्हणू मी दोस्तीला गुपीत सारे ठेविले ,
गोड गोड माझ्याशी बोलून मला मनातून दूर ठेवलेस.



5. तुला पाहिलं की खूप खूप बरं वाटतं ,
क्षणभर जरी दूर गेलीस तरी काळीज तुटून पडतं.



6. तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय ,
माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.



7. वाटलं होतं सावरशील मला वादळात कोलमडताना ,
माहित नव्ह्तं तूही सोबत सोडशील अंधारात चालताना.......



8. वाटले नव्ह्ते स्वप्नातसुध्दा जुळतील तुझेनि माझे ॠणानुबंध ,
निभवू शकू आपण हे रेशमी प्रेमाचे बंध.



9. तुझ्या पायाची धुळ व्हावं ,
तुझ्या जीवनात वात होऊन जळत रहावं ,
दुःखात तुझ्या सहभागी व्हावं एवढंच जीवनातीचं ध्येय.



10. पोर्णिमेच्या चांदण्याला ,
कुठे स्वतःवा प्रकाश चंद्राला अपुरे पडते ,
आज मोकळे आकाश.



11. मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले ,
मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले ,
मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !



12. पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात ,
आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.



13. सा-यांसाठी झिजताना मी फ़क्त तुझीच उरणार आहे ,
झिजून जरी गेले तरी मी तुझ्या आठवणीत विरघळणार आहे.



14. तुझी आठवण आली की मी हसत राहीन ,
या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.



15. तुमच्या सा-यांच्या सहवासात खूप बहरुन जायला होतं ,
पण क्षणीक त्याच्या आठवणीत खूप विरुन जायाला होतं.



16. माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास ,
मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु ,
मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.



17. गेल्या वर्षी भरलेलं तळं ह्या वर्षी कोरडं पडलं ,
म्हणे त्याला एका झ-याने अर्ध्यातच सोडलं होतं.



18. तूच माझी रुपमती सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती म्हणीन ,
केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ?



19. विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट ,
तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.



20. तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण ,
तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.



21. तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे ,
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे.



22. आयुष्यात खूप काही हवं असतं पण ,
हवं असतं ते मिळत नसतं ,
हव ते मिळालं तरी खूप कमी असतं ,
चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.



23. माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल ,
माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.



24. एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो !
तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !



25. पूर्णत्वाच्या शोधाला काहीच अर्थ नसतो ,
या इथल्या चंद्रातसुध्दा एखादा डाग असतो.



26. तुला विसरायचे म्हणजे माझ्या मनाला समजवायचे ,
पण डोळ्यांतून ओघळणा-या अश्रूंना कसे थांबवायचे.



27. पावसाळा अजून लांब असला तरी चातकाला कुठे त्याचे भान असते ,
तुटले एखाद्याचे मन तरीही बोलणा-याला कुठे भान असते.



28. प्रेम म्हणजे गुलाब नव्हे ,
गुलाबाचं जणू रानच असतं ,
सुवास धुंद करीत असतो ,
काट्यांचा मात्र भान नसतं !



29. तुझी वाट पाहताना रात्र अर्धी सरलेली ,
अर्ध्या रात्री माझी ओंजळ नक्षत्रांनी भरलेली.



30. सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला ,
जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला ,
आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील ,
सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.



31. निराशाच करायचीए होती तर आशा का दाखविकीस ?
माझ्या वेड्या मनाला प्रेमाची भाषा का शिकवलीस ?



32. मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही ,
पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही.



33. चंद्रापुढे तुझा चेहरा मला नेहमी मोहक भसतो ,
तू जवळ नसताना मात्र तो चंद्र्ही किती दाहक वाटतो.



34. प्रेम हे कोणाबरोबरही होतं प्रेमासाठी प्रेत्येकजण रडत असतो ,
विचार करुन बोट दाखविलं पाहिजे प्रेम हे भाऊ बहीणीचंही असतं.



35. प्रेमात जरा रागाविल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही आणि ,
रागावून जरा दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.



36. मारली गाठ दोन मनांची आपण तोडण्यासाठी नाही ,
प्रेम केले दोघांनी अर्ध्यावर सोडण्यासाठी नाही.



37. खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला ,
तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं ,
तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा ,
फ़क्त तुझेच नाव घेत असणार ,
मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.



38. प्रेमसुद्धा जीवनासारखं असतं ,
प्रत्येक वळण सोप नसतं ,
प्रत्येक वळणावर आनंदही नसतो ,
पण जगणं आपलं सोडायचं नसतं.



39. आयुष्यात एकदाच तुझ्यावर प्रेम केले पण नशिबानं साथ दिली नाही ,
वाटा जरी संपल्या तरी दिशा बाकी आहेत ,
प्रेम संपलं तरी आठवणी ताज्या आहेत.



40. वा-याशिवाय हालताना झाडाला मोठे कष्ट आहेत ,
तुझ्याशिवाय जगताना जीवन माझे व्यर्थ आहे.



41. आठवण तुझी येताच उर कसा भरुन येतो ,
कितीही आवरायचं म्हटलं तरी अश्रूंचा पूर भरुन येतो.



42. दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस ,
दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस ,
आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.



43. खरं तर तेलाबरोबर वातीने ही कळायला हवं होतं ,
उशिरा का होईना पण तुला माझं प्रेम कळायला हवं होतं.



44. पाऊस आधी तुझ्या गावात येऊन मग माझ्या गावात येणार होता ,
पण का कोणास ठाऊक तो मध्येच फ़ाट्यावर वळला होता.



45. माझ्या हातात हात घेऊन शिकवलंस मला जगायचं कसं ?
पण दुस-याच हात हातात घेण्यापूर्वी विसरलीस शिकवायला मरायचं कसं ?



46. असाच श्वास तोकडा पुन्हा पुन्हा धरायचा ,
असाच जन्म फ़ाटका पुन्हा पुन्हा शिवायचा..



47. तुझ्या प्रत्येक शब्दाची आठवण माझ्या चांगलीच स्मरणात आहे ,
शक्यता तुला विसरण्याची फ़क्त माझ्या मरणात आहे.



48. खरं सांगू मला तुला दुखवायचं नव्हतं ,
मी तुझ्यावर प्रेम करतो एवढंच फ़क्त सांगायचं होतं ,
जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच आज परक्यासारखी वागते ,
पण तरी ही मी ही सहन करतो कारण स्वप्नात ती माझ्याशी प्रेमाने वागते.



49. तुझ्याशिवाय जगणे म्हणजे श्वासाशिवाय जगणं ,
अन तुझ्याशिवाय मरण म्हणजे चितेवाचून जळणं.



50. प्रेम केलंस माझ्याशी संसार केलास दुस-याशी ,
का आलीस माझ्या ह्रदयाशी आयुष्याभर प्रेम केले असते ना तुझ्याशी.



51. तुझ्या डोंळयात आश्रू येतील असं मी कधीच वागणार नाही ,
कारण त्या अनमोल आसवांची किंमत मी चुकवू शकणार नाही.



Harrah's Casino & Racetrack - MapyRO
ReplyDeleteHarrah's 동두천 출장마사지 Casino & Racetrack. 계룡 출장마사지 777 Harrah's Blvd S Atlantic City, NJ 08401. Directions · (609) 군포 출장샵 317-5000. 창원 출장안마 Call Now · More Info. 김제 출장안마 Hours, Accepts Credit Cards, Wi-Fi.