तेव्हा तो गाडीत चढण्यासाठी तयार झाला. तेवढयात फलाटावरचा हमाल म्हणाला, 'सरदारजी, ही
मेलगाडी फास्ट आहे.ती इथे थांबत नाही. ही गेल्यावर तुमची पँसेजर येईल.'
साहेब गर्वाने म्हणाला, 'अरे, ती नाही तिचा बाप थांबेल.' असे म्हणत त्याने आपले क्रुपाण काढले
आणि दोन रुळांमध्ये उभा राहून तो 'ठहरो, ठहरो' असे ओरडू लागला. आता काय होणार असे
वाटून फलाटावरचे सगळे लोक श्वास रोखून पाहू लागले. समोरुन भरधाव वेगात येणा-या
गाडीच्या ड्रायव्हरने जोरजोरात शिटया मारल्या. गाडी चार फुटांवर आली, तेव्हा मात्र साहेबाने
घाबरुन लांब उडी मारली.
गाडी निघुन गेल्यावर हमालाने विचारले, 'काय साहेब घाबरलात काय?'
साहेब फुशारकी ने म्हणाला, 'मी घाबरणार? छट! अरे, ती गाडीच घाबरली आणि मला मारु नका
म्हणुन गयावया करु लागली ते तू ऐकलं नाहीस का? शरण येणा-याला मारणं हे माझं ब्रीद
नाही.'



2. पेशंटला तपासताना डाँक्टर गंभीरपणे म्हणाले, ' तुम्ही सिगरेट ओढणं ताबडतोब सोडलं पाहिजे.'
पेशंटनं विचारलं, 'सिगरेट ओढणं इतकं धोक्याचं आहे काय?'
डाँक्टर म्हणाले, 'होय. तुम्हाला मी तपासत असतांनासुध्दा तुम्ही सिगरेट ओढता. त्यामुळे माझ्या
पँटला दोन वेळा जळत्या सिगरेटनं भोकं पडली. यापेक्षा अधिक धोका तो कोणता?'



3. एकदा स्टेशनच्या फलाटावर एक सधन व्यापारी उतरले.थोडयाच वेळात एक ग्रुहस्थ त्यांच्याजवळ
जाऊन म्हणाला, 'आपण शेठ पारीख ना?'
'हो, पण आपण कोण?' पारीख यांनी विचारलं.
'दहा वर्षापूर्वी मी पैशाच्या अडचणीत होतो. याच फलाटावर तुम्ही मला पन्नास रुपये दिले होते. परत-'
'छे, छे, परत कशाला करता? एखादा गरजू इसम दिसला तर त्याला मदत करा म्हणजे झालं.' शेठ
पारीख औदार्यानं म्हणाले.
त्यावर त्या ग्रुहस्थानं सांगितलं, 'तसं नाही साहेब, मला परत पन्नास रुपयांची गरज आहे, ते तुम्ही
देण्यासाठी मी तुमची विनंती करत होतो.'



4. तुमच्या मिसेसची ड्रायव्हींगची काय प्रगती?
फार जोरात. मी एल. आय. सी. चा एजंट असल्यामुळे मला तर फायदा झाला.
तो कसा काय?
अहो, आमच्या आळीतील सर्वांनी आता विमा उतरवलाय.



5. विमा एजंट सर्व आँफ़िसातून फ़िरत होता.
'खुर्च्यांचा विमा उतरवला आहे?'
'हो' कारकून म्हणाला.
'पंख्यांचा विमा उतरवला आहे?'
'हो,'
'टेबलाचा?'
'उतरवला.'
'या भिंतीवरच्या घड्याळाचा?'
'नाही.'
'का बरं?'
'ते चोरीला जाणार नाही.' आम्ही सगळे कारकून त्याच्यावर नजर ठेउनच काम करतो.



6. मी जेव्हा तुला बघतो, तेव्हा मला चंदूची फ़ार आठवणं येते.
का? माझ्यात आणि चंदूत काही साम्य नाही.
ते बरोबर आहे. पण तुम्ही दोघं माझे शंभर रुपये देणं लागता.



7. एकदा एक मुर्ख माणूस, न्हावी आणि टकल्या प्रवासाला निघाले. चालता चालता रात्र झाली. ते एका
रानात आल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते वाट चुकले आहेत. शेवटी तिघांनी एका झाडाखाली
झोपायचे ठरवले. रानात चोरांचे भय असल्यामुळे दोघांनी झोपायचे आणि उरलेल्या एकाने पहारा
करायचा असे ठरले.
प्रथम नाव्ही म्हणाला, तुम्ही दोघं झोपा. मी पहारा करतो.' दोघे झोपले न्हावी पहारा करीत
बसला.काहीतरी उद्योग हवा, म्हणून न्हाव्याने आपली धोपटी काढली आणि बसल्या बसल्या मूर्ख
माणसाचे केस कापून तुळतुळीत गोटा केला. थोड्यावेळाने त्याने पहा-यासाठी मूर्ख माणसाला
उठवले. मूर्ख उठला व म्हणाला, 'न्हावीदादा, तुम्ही चूक केलीत. मला उठवण्याऎवजी तुम्ही
टकल्याला उठवलेलं दिसतंय !'



8. पार्टी रंगात आली होती. पण वासूनाना घरी जायची घाई करीत होते त्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला,
'वासूनाना एवढे बायकोला घाबरता? तुम्ही पुरुष आहात की उंदीर?'
'मी नक्कीच पुरुष आहे' वासूनाना म्हणाले.
'कशावरुन?'
कारण माझी बायको उंदराला घाबरते,' वासूनाना म्हणाले.



9. 'ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला त्यांना त्यांना तू फ़सवलंस ? ' वकील आरोपीवर बोट रोखून
तावातावाने बोलत होता. नंतर वकीलाने कळवळून विचारले, 'अरे, जो तुझ्यावर विश्वास ठेवतो,
त्याला फ़सवणं तुला शक्य तरी कसं होतं?'
'सोपं आहे साहेब,' आरोपी शांतपणे म्हणाला, ' जो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला फ़सवणं
मला कधीच शक्य होत नाही.'



10. नवीन गड्याला ठेवून कुठं पंधरा वीस दिवस झाले नाहीत तोच एक दिवस रमा त्याला मोठमोठ्यानं
बोलताना दिसली. रमेशला हे मुळीच आवडलं नाही. परंतू तो गप्प राहीला.
परंतु संधी मिळताच तो तीला म्हणाला, 'अगं कशाला उगीच त्या बिचा-याला एवढं बोललीस?'
'तुम्हाला समजायचं नाही ते. मी मुद्दामच बोलले त्याला.' रमा म्हणाली.
'मुद्दाम?' रमेशने चकित होऊन विचारले.
'होय,' रमा म्हणाली, 'आज त्याला मी गाद्या, सतरंज्या, उशा उन्हात घालायला सांगितल्या आहेत.'
'पण त्याचा काय संबध...?'
'आहे' रमा हसून म्हणाली, 'तो रागात असला की धोपटण्याचं काम चांगल करतो.



11. साहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल याची कल्पना अम्रुतरावांना काही येईना, त्यांनी भीतभीतंच
साहेबांच्या खोलीत प्रवेश केला आणि दोन्ही हात मागं धरत ते अदबीने उभे राहिले.
' या अम्रुतराव' साहेब, अम्रुतरावांकडे पहात म्हणाले, 'अम्रुतराव, तुम्ही मला फ़ारच कंजूष समजता ना? ' 'नाही... नाही... साहेब मी तसं कधीच म्हटंल नाही.' अम्रुतराव घाबरत म्हणाले.
'घाबरु नका अम्रुतराव,' साहेब हसून म्हणाले, ' तुमच्या कामाची जाणीव आम्हाला आहे, आम्ही त्याची
कदर करतो. गेली वीस वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे आणि इमानाने काम केलं आहे, त्याची कदर
म्हणून मी तुम्हाला शंभर रुपयांचा हा चेक देणार आहे.'
अम्रुतराव एकदम खूष होऊन म्हणाले, 'मी...मी... आपला फ़ार आभारी आहे. आपण ....'
परंतू त्यांना थांबवून साहेब पुढे म्हणाले, 'आणि ह्याच प्रामाणिक पणाने जर तुम्ही पुढची पंधरा वर्षे
काम केलं तर मी ह्या चेकवर सही करणार आहे.'



12. एक कम्युनिस्ट आपल्या कम्युनिस मित्राला कम्युनिझम म्हणजे काय हे सांगत होता, 'मित्रा... तो
म्हणाला, एखाद्या मांजराला तू तिखट कसे खायला लावशील?'
'दोन मार्ग आहेत,' मित्र म्हणाला, 'मी त्याची मानगुट पकडीन आणि खायला लावीन किंवा एक
मासा कापून त्या माशात तिखट भरीन आणि तो खायला देईन.'
' हे आपल्या कम्युनिस्ट तत्वप्रणालीच्या विरुध्द आहे. पहिल्या प्रकारात बळजबरी आहे, तर दुस-या
प्रकारात त्या मांजराची फ़सवणूक आहे.'
'मग? ' मित्राने विचारलं.
'सोपं आहे. मी त्या मांजरीच्या शेपटीला तिखट चोळीन जेव्हा त्या शेपटीची आग होईल, तेव्हा ते
आपणहूनंच शेपूट चाटायला लागेल.



13. एक नवी बिल्डिंग तयार होत होती. सगळे मजूर तेथे काम करीत होते. एक मजूर मुकादमाकडे आला
आणि म्हणाला, 'माझं फ़ावडं मिळत नाही. कुणी तरी चोरलेलं दिसतंय.'
मुकादमाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि तो म्हणाला, 'काही काळजी करु नकोस जा. आज
आराम कर.' तरी तो मजूज तेथेच उभा. मुकादमाने त्याला विचारले, 'काय रे काय झालं?
आराम कर. आजच्या दिवसाचे पैसे तुला मिळतील.'
'ते खरं आहे हो. पण फ़ावडे नसतांना आराम कसा करु?
सगळे मजूर फ़ावड्यावर डोकं टेकून आराम करतात.'



14. माझी मिसेस खोटं बोलतेय अशी माझी खात्री आहे.'
'ती कशी काय?'
'काल दुपारी तू कुठं होतीस असं विचारताच ती म्हणाली, मी माझ्या मैत्रीणी बरोबर, कविता बरोबर
पिक्चरला गेले होते.'
'मग?'
'खोटी गोष्ट आहे. कारण त्यावेळी मीच कविताला घेऊन पिक्चरला गेलो होतो.'



15. एक श्रीमंत माणूस रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत होता. आपण खूप पैसेवाले
आहोत, त्यामुळे आपल्याला सगळे ओळखतात, असे त्याला वाटे, तोच तिकीटतपासनीस आला.
'तिकीट प्लीज,' तिकीट चेकर तिकीट मागू लागला.
'माझ्याजवळ तिकीट नाही,' तो श्रीमंत ऎटीत म्हणाला. त्याला वाटलं, तिकीट चेकर आपल्याला
ऒळखेल आणि म्हणेल, 'तुम्ही? मी प्रथम ऒळखलं नाही आपल्याला.'
पण झालं उलटंच, तो तिकीट चेकर म्हणाला, 'तुम्हाला या डब्यातून उतरावे लागेल.'
'मला ऒळखलं नाहीस. माझा चेहरा हेच माझे तिकीट आहे.' श्रीमंत ऎटीत म्हणाला.
'असं?' त्याचा चेहरा न्याहाळत तिकीट चेकर म्हणाला, 'मग थर्ड क्लासचं तिकीट असतांना फ़स्ट
क्लासमध्ये का?'



16. रेल्वेतील कारकून आपल्या साहेबाला म्हणाला, ' या आणखी एका शेतक-याने गायीच्या संदर्भात
रेल्वेला कोर्टात खेटले आहे.'
'आपल्या एखाद्या गाडीने त्याच्या गायीला उडवलेलं दिसतंय. ती बिचारी गाय बहुतेक मेली
असावी.'
'नाही, तसं नाही साहेब, त्याची तक्रार वेगळीच आहे. तो म्हणतो की दोन स्टेशनांच्या मध्ये आपल्या
गाड्या इतक्या हळू चालतात की, प्रवासी चक्क खाली उतरुन गायीचं दूध काढतात आणि
पुन्हा गाडीत जाऊन बसतात.'



17. नुकत्याच मुलाखतीसाठी आलेल्या नव्या उमेदवाराला मँनेजर म्हणाला, 'तुमच्या अर्जावरुन असे
दिसते की, गेल्या महीन्यात तुम्ही चार ठिकाणी नोक-या केल्यात.'
'होय साहेब, त्यावरुन तुमच्या लक्षात येईल की, मला किती ठिकाणी बोलवतात.'



18. म्हाळसकाकू न्यायाधिशांसमोर उभ्या होत्या.न्यायाधीशांनी एकदा त्यांच्याकडे बघितले आणि
विचारले 'तुमचा नवरा तुम्हाला कंटाळला आहे असं तुम्हाला का वाटतं?'
'मला हल्ली तसंच वाटतं?'
'किती दिवस असं वाटतं?'
'खूप दिवस.'
'पण का?'
'कारण गेल्या सात वर्षात ते एकदाही घरी आले नाहीत.'



19. चिंतामण ज्या कार्यालयात कामाला होता. त्या कार्यालयातील त्याचा एक साहेब एक दिवशी
चिंतामणवर चांगलाच भडकला.आणि तो त्याला म्हणाला, 'मला तू काहीही सांगू नकोस,
कोणत्या गाढवाने तुला नोकरीला ठेवले, खड्यात जा एकदाचा.'
ही हकीकत चिंतामणने घाईघाईने आपल्या सास-याला कथन केली आणि साहेब आपल्याला
खड्यात जा म्हणाला असे कळवळून सांगितले. त्यावर सासरेबुवा चिंतामणला म्हणाले.
'असे म्हणाला तुझा साहेब? मग तू काय केलेस.'
'मग मी काय करणार, मी तुमच्याकडे आलो.' चिंतामण उद्गरला.



20. एका स्त्रिच्या साडीवर चांदण्यांची डिझाईन होती व तिच्या हातात एक दाट केस असलेला छोटासा
कुत्रा होता. ती रस्त्यावरुन जात असतांना एक लांबलचक दाढीवाला येतो.
दाढीवाला - आकाश के तारे, तेरे साडी पे.
स्त्री - मेरे कुत्ते के बाल, तेरे दाढी पे.



21. बंडू - आई, तुला सर्कशीतले खेळ येतात का गं ?
आई - नाही रे.
बंडू - मग शेजारच्या काकू कशा म्हणतात की तू बाबांना बोटावर नाचवतेस म्हणून?



22. आई - बंडू दुकानातून अर्धा किलो साबुदाणा घेऊन ये. उपवासाच्या दिवशी साबुदाणा चालतो.
(थोडया वेळाने)
आई - अरे, तू साबुदाणा का आणला नाहीस?
बंडू - आई तू म्हणाली होतीस ना, साबुदाणा उपवासाच्या दिवशी चालतो म्हणून मी साबुदाण्याची
पिशवी रस्त्यावर ठेवली. आता तो चालत चालत येईल इकडे.



23. मुलगा - बाबा, कोल्ह्याला कोल्हाच का म्हणतात ?
बाबा - याचं उत्तर सोपं आहे. कोल्हा कुणासारखा दिसतो? तो हत्तीसारखा दिसतो? नाही. वाघासारखा
दिसतो का? नाही. चिमणीसारखा दिसतो का? नाही. मग तो कुणासारखा दिसतो?
मुलगा - कोल्ह्यासारखा.
बाबा - बरोबर. म्हणून त्याला कोल्हा म्हणतात.



24. शिक्षक - रमेश, तुला रोज शाळेत यायला उशिर का होतो? तू तर सायकलवरुन येतोस.
रमेश - याचे कारण शाळेच्या रस्त्यावर असलेली पाटी.
शिक्षक - कोणती पाटी?
रमेश - त्यावर लिहिलयं, पुढे शाळा आहे. सावकाश जा.



25. घटस्फ़ोटाचा खटला चालू आहे.
माधवी - न्यायमूर्ती, लग्नानंतर वर्षभर सुखाने संसार केला आणि वर्षाने वासंती आली.
न्यायमुर्ती - मग वाईट काय त्यात?
माधवी - नाही हो. वासंतीचं वय वीस वर्ष आहे. चांगली देखणी, शेजारी राहणारी.



26. वासंती - मी तुमच्यासाठी किती कष्टाने गाजर हलवा केला त्याची तुम्हाला कल्पना नाही.
वसंत - आणि मीही तो किती कष्टाने खाल्ला त्याची तुला कल्पना नाही.



27. वडील - काँलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?
मुलगा - दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी.



28. विवेक - लठ्ठ माणसं नेहमी गोड का बोलतात?
विशाल - कडू बोललं तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणून.



29. बगाराम वर्तमानपत्राच्या कार्यालयात गेला. त्याला त्याच्या दिवंगत भावाच्या निधनाची बातमी
प्रसिध्द करायची होती. तिथल्या कारकूनाला त्यानं किती खर्च येईल असे विचारले.
कारकून - 'एका काँलम सेंटीमीटरला ४० रुपये.'
बगाराम - ' अरे बापरे माझा भाऊ तर १८० सेंटीमीटर होता.'



30. दोन बायका ट्रेनमध्ये भांडत होत्या. त्यांचे भांडण खिडकी वरुन चाललं होतं. एक बाई खिडकी उघडत
होती आणि दुसरी तितक्याच जोरात बंद करीत होती.
'ही खिडकी उघडली तर मला सर्दी होईल आणि मी मरुन जाईन.' एक म्हणाली.
' पण खिडकी बंद ठेवली तर मी गुदमरुन जाईन,' दुसरी म्हणाली.
आजूबाजूचे सगळेजण त्या भांडणाला वैतागले होते. पण काय करावं हे कुणालाच कळत नव्हतं.
तेवढ्यात त्याच डब्यात बसलेला एक चुणचुणीत मुलगा पुढे आला आणि म्हणाला, 'मी सांगतो काय
करायंच ते. प्रथम ही खिडकी उघडा. त्यामुळे एक बाई मरेल. नंतर बंद करा. म्हणजे दुसरी बाई
मरेल आणि आपल्याला शांतता मिळेल.'



31. दोन मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटले.
'तुझी बायको स्वभावानं कशी आहे रे?' एकाने विचारले.
'खूप चांगली आहे.' दुसरा म्हणाला.
' वा ... ऎकून बरं वाटलं.'
' तुझी रे' माझी बायको तर रोज माझी पूजा करते.
' काय म्हणतोस?'
' हो. रोज एकदा तरी माझ्यापुढे हात नाचवून ती म्हणते आता दिवे ऒवाळू का तुम्हाला?'



32. गणिताचे खडूस सर आडनावाप्रमाणेच खडूस होते. नदीत बुडत असतांना एका विद्यार्थ्याने त्यांना
वाचवल्यावर ते त्याला म्हणाले, 'बोल, तुझ्यासाठी काय करु?'
'सर फ़क्त एकच करा. मी तुम्हाला वाचवलं हे शाळेत कुणालाही सांगू नका. नाहीतर मुलं मलाच
नदीत बुडवतील,' विद्यार्थी म्हणाला.



33. विनू एक प्रामाणिक कारकून होता. एके दिवशी त्याला पगारात २५ रुपये जास्त आले. तात्काळ तो
आँफ़िसात गेला आणि आपल्या साहेबाला म्हणाला, ' साहेब, यावेळी चुकून माझ्या पगारात
२५ रुपये जास्त आले आहेत.'
साहेबांनी त्याला सांगितले, 'तुम्हाला पंचवीस रुपयांनी वाढ दिलेली आहे. चूक वैगरे काही नाही.'
'केव्हापासून दिली?' विनूने विचारले.
'गेल्या सहा महीन्यापासून.' साहेब म्हणाले.
'साली!....'
आँ, कुणाला म्हणालात?'
'तुम्हाला नाही. बायकोला. तिनं मला हे कधीही सांगितलं नाही.'



34. एकदा एक म्हातारा माणूस देवळात गेला. तेथे देवळाचा पुजारी बसलेला होता.
'या पेटीत पै-पैसा टाका.' पुजारी म्हणाला.
त्या म्हाता-या माणसाने पेटीत एक रुपयाचे नाणे टाकले. 'हे पैसे जमवून तुम्ही काय करता?' त्याने
पुजा-याला विचारले.
'ते देवाचे असतात. आम्ही ते देवाला देतो.'
'तुझं वय काय?'
'तीस. तो पुजारी म्हणाला.
'मी ऎंशी वर्षांचा आहे. तुझ्यापेक्षा मीच देवाकडे अगोदर जाईन, असं नाही का तुला वाटत?' एवढे
बोलून त्याने ती पेटी उचलली आणि तो चालू लागला.



35. दोन दारुडे गप्पा मारत रेल्वेच्या रुळामधून चालले होते. बराच वेळ ते असेच चालत होते. थोड्या
वेळाने त्यातला एकजण दुस-याला म्हणाला, ' माझ्या आयुष्यात मी जिन्याला इतक्या पाय-
या बघितल्या नाहीत. थकलो रे बाबा.'
दुसरा दारुड्या त्याच्याकडे बघत रागाने म्हणाला, ' मुर्ख कुठला. थकायला काय झालं? पाय-या
काही फ़ार उंच नाहीत.'



36. तो प्रथम तुरुंगात गेला.
तो निरक्षर होता. तरी हुशार होता.
म्हणून त्याला तिथं लिहायला शिकवण्यात आलं.
आता तो खोट्या सह्या करण्याबद्दल तुरुंगवास भोगतो आहे.



37. 'तुला तुमचं छोटं बाळ आवडतं?' काकांनी छोट्या बंडूला विचारलं. 'मुळीच नाही.'
'का रे?'
'मला भाऊ हवा होता.'
'का?'
'तो माझ्याशी क्रिकॆट खेळला असता. दुसरे खॆळ खॆळला असता. हा तर नुसता रडतच असतो.'
'मग तुझ्या आईला सांगून हाँस्पिटलमधून भाऊ घेऊन ये की.'
'आता उशिर झाला. आम्ही हे बाळ दहा दिवस वापरलं आहे. आता बदलून कसं देतील?'



38. एका मारवाड्याचे आँपरेशन होते. आँपरेशनची सगळी तयारी झाली होती. डाँक्टर त्याला आँपरेशन
टेबलावर नेणार तोच मारवाड्याने खिशात हात घातला आणि पैशांचे पाकीट काढले.
तोच डाँक्टर त्याला म्हणाले, 'छे! ....छे! .... पैसे आँपरेशन झाल्यावर द्या. आता काही घाई नाही.'
मारवाडी म्हणाला,' नाही मी आत्ताच पैसे देत नाही. फ़क्त तुम्ही क्लोरोफ़ाँम देण्यापूर्वी मी ते मोजून
ठेवतो आहे.'



39. 'अत्रे साहेब, तुम्ही एवढे पहाडासारखे आहात, वाघासारखे शूर आहात, ग्रेट आहात, पण समजा एखादा
वाघ अचानक तुमच्यापुढे येऊन उभा राहीला, तर तुम्ही काय करायंच ठरवाल?' एका अत्रे
भक्ताने अत्रे यांना विचारले.
अत्रे म्हणाले, 'मी कोण ठरवणार? काय करायचं ते वाघानेच ठरवायचे आहे.



40. तो माणूस गरीब चेह-याने कोर्टात उभा होता. वकील त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत होता.
' आमच्या अशिलानं तुझी कबूतरे गोळ्या घालून ठार मारली असं तू शपथपूर्वक सांगू शकशील?'
'मी त्याने ठार मारली असं म्हणालो नाही.'
'मग तुझं म्हणणं तरी काय आहे? '
'मी म्हणालो, माझा त्याच्यावर संशय आहे.'
'तू माझ्या अशिलावर का संशय घेतोस याची कारणे सांगू शकशील?' वकीलाने कुत्सिकपणे विचारले.
'हो, एक म्हणजे मी त्याला माझी कबूतरे जेथे होती त्या जागी बंदूक घेऊन उभा असलेला दुरुन
बघितला.'
'पण त्यावरुन त्याने तुझी कबूतरे मारली, असे सिध्द होत नाही.'
'दुसरे असे की, मी बंदूकीच्या गोळीचा आवाज ऎकला आणि त्याचवेळी चार- पाच कबूतरे खाली
पडतांना बघितली.'
'यावरुनही ही त्यानेच मारली असं सिध्द होत नाही.'
'तिसर म्हणजे माझी चार कबूतरे त्याच्या खिशांत मिळाली.'
' यावरुन काय सिध्द होणार? एवढंच सिध्द होतं की, ती माझ्या खिशात शिरली आणि बंदूकीच्या
गोळीने मरण्यापेक्षा आत्महत्या केलेली काय वाईट, असा विचार करून त्यांनी आत्महत्या
केली.' तो माणूस उपरोधिकपणे म्हणाला.



No comments:
Post a Comment