1. रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन ,
-------- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन .



2. नव्या आयुष्याची नवी नवी गाणी ,
------- च्या घराण्यात -------- रावांची झाले मी राणी .



3. पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते ,
--------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते .



4. सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही ,
---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई .



5. हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी ,
------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी .



6. शिंपल्यात सापडले माणिक मोती ,
------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी .



7. महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स ,
------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस .



8. आंनदाने भरला दिन हा लग्नाचा ,
----- रावांना घास देते गोड जिलेबीचा .



9. मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस ,
----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स .



10. आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी ,
----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी .



11. सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी ,
----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी .



12. सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण ,
----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण .



13. सासरचे निराजंन माहेरची फुलवात ,
----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात .



14. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ,
----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने .



15. माहेर जणू गंगा, सासर जणू सागर ,
त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर .



16. आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश ,
----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश .



17. पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती ,
----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती .



18. सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार ,
यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार .



19. मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती ,
----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती .



20. पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात ,
----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात .



21. गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद ,
----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात .



22. सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी ,
----- रावांचे नाव घेते ------ च्यावेळी .



23. संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा ,
----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा .



24. स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी ,
----- रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी .



25. रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा ,
-----रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा .



26. नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा ,
----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा .



25. मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार ,
----- रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार .



28. हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी ,
----- रावांच्या जीवनात आहे मला गोडी .



29. सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात ,
----- रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट .



30. भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची ,
----- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची .



31. जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले ,
----- रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले .



32. शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान ,
----- रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान .



33. आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण ,
----- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण .



34. कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले ,
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले .



35. माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन ,
----- रावांच्या संसारात मन घेते वळून .



36. लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी ,
----- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी .



37. संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान ,
----- रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान .



38. लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने ,
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने .



39. संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर ,
आयुष्याचा प्रवास करते ------ रावांबरोबर .



40. नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
----- रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा .



41. सुखी संसारात हवी विश्वासाची जोड ,
----- रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड .



42. अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली ,
----- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली .



43. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री ,
आजपासून मी झाले ----- रावांची ग्रुहमंत्री .



44. शब्द तिथे नाद कवी तिथे कविता ,
----- रावांची जोड जणू सागर आणि सरिता .



45. नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण ,
----- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण .



46. चंदनाच्या झाडावर बसला मोर ,
----- रावांच्या जीवावर मी आहे थोर .



47. चंद्राचा उदय, समुद्राला भरती ,
----- रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती .



48. सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास ,
----- रावांना देते मी जिलेबीचा घास .



49. पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप ,
----- रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज .



50. घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस ,
----- रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस .



51. मोठयांचा करावा मान सन्मान ,
------ रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण .



52. मन असावे स्वच्छ, प्रेमळ आणि पवित्र ,
------- रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र .



53. कपाळाला कुंकु गळयात मोत्यांचा हार ,
------- रावांचे नाव घेताना आनंद होतो फार .



54. सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान ,
------- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान .



55. पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान ,
------- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान .



56. सत्यम, शिवम, सुंदरम साहित्याची आस ,
------- रावांना घालते मी लाडवाचा घास .



57. क्रुष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहीले पत्र ,
------- रावांसाठी घातले मी मंगळसुत्र .



58. आषाढात दाटले घन मोर नाचतो होऊन विभोर ,
------- रावांचे नाव घेते सर्वांसमोर .



59. चालली सप्तपदीची सात पावले ,
------- रावांच्या नावाने मंगळसुत्र बांधले .



60. भावनात जन्मली कल्पना फुल गुंफीले शब्दांचे ,
------- रावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे .



61. प्राजक्ताच्या पायथ्याशी शुभ्र फुलांच्या राशी ,
------- रावांचे नाव घेताना मनात दाटली खूशी .



62. पुणेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे ,
------- रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे .



63. देवाजवळ करीत होते दत्ताची आरती ,
------- राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी .



64. जिरे साळीचा भात पिकतो मावळात ,
------- रावांचे नाव घेते----- च्या देवळात .



65. चंद्राची जशी चंद्रीका, वसिष्ठांची जशी अरुंधती ,
तशीच मी होईन -------- रावांची आवडती .



66. पानोपानी फुल फुलावे रंग गहिरे असावे ,
------- रावांच्या संसारात सुख माझे हसावे .



67. शुभदिनी, शुभकाळी आली आमची वरात ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या घरात .



68. थंडगार पाण्याला वाळयाचा सुवास ,
------- रावांचे नाव घेते जोडी आमची खास .



69. सोन्याचे मणी रेशमात गुंफले ,
-------- राव माझे वाचनात गुंतले .



70. सागरतिरी शुभ्र वाळू ,
------- राव म्हणतात, चल राणी टेनिस खेळू .



71. शुभदिनी मंगलकाली मंगलमुर्ती ये घरा ,
------- रावांच्या जीवनात भाग्योदय खरा .



72. दस-याचे महत्व सिमोलंघनात ,
------- रावांच्यासह सुखी जीवनी नंदनवनात .



73. वैशाखाच्या महिन्यात उन्हाळयाचा जोर ,
-------- घराण्यात ------- राव पुरुष थोर .



74. श्रावणाच्या महिन्यात जिकडे तिकडे पाणी ,
------- रावांच्या भेटीसाठी आतुर चातकावाणी .



75. दरवळतोय घरात माझ्या अत्तराचा सुगंध ,
------- रावांचा सहवास करतोय मला धुंद .



76. मखमली शेजेवर अत्तराचे सिंचन ,
करते सदा मनामध्ये ------- रावांचे चिंतन .



77. श्लोक रामदासांचे आहेत किती छान ,
------- रावांच्या संसारात हरवले मी भान .



78. लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचे फुल ,
------- रावांना पहाताच पडलीय मला भुल .



79. चांदीच्या समईत रेशमाची वात ,
------- रावांबरोबर करते संसाराला सुरुवात .



80. सारंच गेलय बदलुन माझं नावही नवं ,
------- रावांनी दिलं मला सर्वच जे हवं .



81. मंगळागौरीसाठी जमवली सोळा प्रकारची पत्री ,
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री .



82. नको सोनं, नको मोती, नको मला चंद्रहार ,
------- रावांचे ज्ञान नी कर्तुत्व हेच माझे अलंकार .



83. खुप पाहिली तीर्थक्षेत्र, पवित्र वाटते काशी ,
------- रावांचे नाव घेते -------- च्या दिवशी .



84. केतकीच्या वासाने नाग होतो धुंद ,
------- रावांमुळे सारं घडलं पण शब्द नाहीत आभारा .



85. इंद्रधनुच्या झुल्यावर मन झोके घेई ,
------ रावांच्या संसारी बालक्रुष्ण येई .



86. ताटभर दागिन्यांपेक्षा माणसे असावी घरभर ,
------- रावांचे नाव घेते आर्शीवाद द्यावा जन्मभर .



87. कोकिळाच्या कुंजनाने लागते वसंताची चाहूल ,
------ रावांबरोबर टाकते संसारात पाऊल .



88. द्राक्षाच्या वेलीची दाट पसरते सावली ,
------ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली .



89. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विरांनी घेतली उडी ,
------ रावांच्या नावाने गळयात बांधते मंगळसुत्राची जोडी .



90. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांना झाली शिक्षा ,
------ रावांकडे मागितली मी सौभाग्याची भिक्षा .



91. देवा ब्राम्हणांच्या साक्षीने घेतला माझा हातामध्ये हात ,
------ रावांची लाभली मला साता जन्माची साथ .



92. झाड डोले, वेल डोले, डोलतो वनश्री ,
------- रावांचे नाव घेऊन झाले मी भाग्यश्री .



93. प्रेमळ माझे आई वडील, वत्सल सासु सासरे ,
------- रावांच्या घरी येणार आता तारे हसरे .



94. निलमणी आकाशात चंद्राची प्रभा ,
------- रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा .



95. सुवासिनीचं पहिल व्रत मंगळागौरीची पुजा ,
------- रावांचे नाव घेणं म्हणजे गोड सजा .



96. निलमणी आकाशात लक्ष्मी करते वास ,
------- रावांना घास घालते करंजीचा घास .



97. चंद्र सुर्य नक्षत्रांनी शोभा येते नभाला ,
------- रावांच्या प्रेमाचा सुगंध माझ्य़ा मनाला .



98. सरस्वतीच्या देवळात तांदुळाच्या राशी ,
------- रावांचे नाव घेते -------- च्या दिवशी .



99. प्रसन्न माझे घरकुल साधे, इथे शांती नांदे ,
------- राव मला पती लाभले भाग्य थोर माझे .



100. रात्री फुलराणी देते सुगंध ,
------- रावांच्या जीवनात नेहमीच असतो आनंद .



No comments:
Post a Comment