1. सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले ,
----- रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले .


2. अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य ,
----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य .


3. मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार ,
----- रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार .


4. आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे ,
----- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे .


5. नीलवर्ण आकाशात चमकतात तारे ,
----- रावांचे नाव घेते लक्ष दया सारे .


6. सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला ,
----- रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला .


7. इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून ,
----- रावांचे नाव घेते ----- ची सून .


8. खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड ,
----- रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड .


9. इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर ,
---- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर .


10. फुलात फुल जाईचे फुल ,
----- रावांनी घातली मला भूल .


11. साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज ,
----- रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज .


12. पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून ,
----- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन .


13. संसार सागरात प्रीतीच्या लाटा ,
----- रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा .


14. आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस ,
----- राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस .


15. सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह ,
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह .


16. लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा ,
----- रावांसाठी जीव झाला माझा वेडा .


17. आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर ,
आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या बरोबर .


18. आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा ,
----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा .


19. सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी ,
----- राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी .


20. मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर ,
----- रावांचा सहवास लाभो जन्मभर .


21. प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी ,
जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या चरणी .


22. चांदीच्या ताटात पक्वानांची रास ,
----- रावांना देते लाडूचा घास .


23. रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते ,
लाडूचा गोड घास ----- रावांना देते .


24. मंगळागौरीची पूजा मनोभावे करते ,
----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते .


25. चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल ,
----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल .


26. नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर ,
----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर .


27. उंबरठयावरचं माप पायांनी लोटते ,
----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते .


28. आई, बाबा येते आशीर्वाद दयावा ,
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा .


29. ----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन ,
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन .


30. मोत्याची माळ, सोन्याचा साज ,
----- रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज .


31. मंगळागौरी माते नमन करते तुला ,
----- रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला .


32. दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती ,
----- रावांना ओवाळते मंगल आरती .


33. थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले ,
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले .


34. सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा ,
----- रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा .


35. मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा ,
----- रावांच्या संसारात लावीन दिप नवा .


36. संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल ,
----- रावांना लागली बाळाची चाहूल .


37. फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे ,
----- रावांच्या बाळाचे आज आहे बारसे .


38. गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज ,
----- रावांच्या बाळाची आज आहे मौंज .


39. गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष ,
----- रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष .


40. सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या ,
सोनार घडवी दागिने ----- रावांच्या बाळाला .


41. वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर ,
----- रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर .


42. दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र ,
----- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र .


43. अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा ,
-----रावांच्या नावावर भरते लग्नचुडा .


44. आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात ,
----- रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात .


45. शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध ,
----- रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद .


46. जीवनात ही घडी अशीच राहू दे ,
----- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे .


47. संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती ,
----- रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती .


48. कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात ,
----- रावांचे नाव घेते माझ्या मनात .


49. श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान ,
----- रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान .


50. निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे ,
लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे .


51. नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा ,
------- रावांचे नाव आहे लाख रुपये तोळा .


52. पौर्णिमेच्या दिवशी प्रुथ्वीवर पडतो चंद्राचा प्रकाश ,
ग्रुहलक्ष्मी सहभाग्यलक्ष्मी येवो ------- रावांच्या घरात .


53. जीवनासाठी कला म्हणून कलेवर केली मात ,
कलात्मक जीवन जगण्यासाठी ------- रावांच्या हाती दिला हात .


54. सूर छेडिता शब्द उमटले नवे ,
-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे .


55. नभी उमटते सप्तरंगी इंद्रधनुष्य ,
------- रावांचे नाव घेते त्यांना मिळो दीर्घायुष्य .


56. नवीन निघाल्या वाचून घ्यावा बोध ,
------- रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध .


57. सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा ,
------- रावांचा आणि माझा साता जन्मांचा जोडा .


58. जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा ,
------- रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा .


59. लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार ,
------- राव माझे दिसतात फारच रुबाबदार .


60. राजहंस पक्षी खातो मोत्यांचा चारा ,
------- रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा .


61. काचेच्य़ा बशीत संत्र्याची फोड ,
------- रावांचे बोल अम्रुताहूनी गोड .


62. चांदीच्या सुपात फणसाचे गरे ,
------- राव दिसतात बरे, पण वागवतील तेव्हा खरे .


63. कौतुकी सासुसासरे, हौशी नणंद ,
------- रावांचे नाव घेताना होतो खुप आनंद .


64. पाँलीस्टरचा कपडा कातरीने कापला ,
------- रावांच्या जीवनात मला आनंद वाटला .


65. रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते ,
-------- रावांच्या डोळयात माझेच प्रतिबिंब दिसते .


66. विद्येचा नसावा आभिमान पैशाचा नसावा गर्व ,
------- रावांचे नाव घेते ऐकत राहा सर्व .


67. भुंग्याच्या सहवासात विकसते कळी ,
------- रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी .


68. असावे नेहमी हसतमुख बोलावे नेहमी गोड ,
------- रावांच्या संसाराला ------- ची लाभली जोड .


69. मंगळ्सुत्राच्या दोन वाटया म्हणजे सासर माहेरचा संगम ,
------- रावांच्या सहवासाने झाला सौभाग्याचा उगम .


70. बरेच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार ,
------- रावांनी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार .



71. करी बांधल्या कंकणासवे आले मी या घरी ,
------- रावांच्या संगतीत मी त्रुप्त सदा अंतरी .



72. उत्तम कुळी जन्मले उच्च कुळी आले ,
------- रावांचे नाव घेऊन भाग्यशाली झाले .



73. प्राण्यात प्राणी हत्ती हा लठ्ठ ,
------- रावांचे नाव घेण्यासाठी -------- चा हट्ट .



74. -------- भाजीला सुवासिक मसाला ,
------- रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला .



75. द्राक्षांच्या वेलीखाली चरत होती हरणी ,
आई वडिलांनी अर्पण केले ------- रावांच्या चरणी .



76. सुशील सासुकडे पाहुन आईची नाही येत आठवण ,
------- रावांच्या संगतीत सुख सम्रुध्दीची साठवण .



77. आगगाडीची शिटी, मोटारीचा भोंगा, सायकलची घंटी ,
------- रावांच्या गळयात सोन्याची कंठी .



78. हिरवी साडी बुटटयाची खण ,
------- रावांचे नाव घेते -------- चा सण .



79. पारिजातकाचे फुल मधोमध पिवळे ,
------- रावांचे रुप श्रीक्रुष्णासारखे सावळे .



80. थेंबाथेंबाची रांगोळी शेवटच्य़ा थेंबापर्यत जोडावी ,
------ रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी .



81. चकोराला असते चांदण्याची साथ ,
------- रावांना देते -------- चा घास .



82. बंधनात असते अवीट गोडी ,
म्हणून ------- रावांनी आणि मी घालून घेतली लग्नाची बेडी .



83. हिमालय पर्वतावर मोरांनी फोडला टाहो ,
------- रावांचे नाव नेहमी माझ्या ह्रदयात राहो .



84. नाही कशी म्हणू तुम्हा घेते मी नाव ,
------- रावांच्या बाळाला दिले तुम्ही गोड नाव .



85. काँलेजमध्ये असतानाच ------- रावांनी मला हेरलं ,
शिक्षण संपल्याबरोबर त्यांनी मला वरलं .



86. पाच पांडव सहावी द्रोपदी सती ,
------- रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती .



87. मित्रांच्या घोळक्यातुन उठून दिसते स्वारी ,
------- रावांची झाली मी भाग्यवती खरी .



88. दहातून दहा गेले बाकी राहिली शून्य ,
------- रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य .



89. कोजागिरीच्या चांदण्यात हाती घेतला हात ,
------- राव देणार मला जन्मभराची साथ .



90. स्त्रियांच्या जातीने नम्रतेने वागावे ,
------- रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे .



91. सासु-सास-यांची छाया, आई वडिलांची माया ,
मी तर आहे ------- रावांची जाया .



92. ज्ञानेशांची ओवी, मोरोपंताची आर्या ,
मी तर आहे ------- रावांची भार्या .



93. नव्या नवरीचा आज उतरला साज ,
ख-या अर्थाने ग्रुहिणी ------- रावांची झाले आज .



94. सहवासाने वाढते संसारात रंगत ,
------- रावांचे नाव घेताना वाटते मला गंमत .



95. चांदीची चुल सोन्याचा विस्तव ,
------- रावांचे आले दोस्त तर माडीवर जाऊन बस .



96. या झाडावरुन त्या झाडावर उडत होते पक्षी ,
------- रावांचे नाव घेते चंद्र सुर्य साक्षी .



97. पुणं तिथं काय उणं म्हणतात सारी जणं ,
------- रावांनी केलं सार्थ माझं जिणं .



98. नको मला सोनं चांदी, नको मला शालु शेला ,
------- रावांच्या जीवनासाठी देह अर्पण केला .



99. भ्रमराच्या गुंजारवे मुग्ध झाली कमलिनी ,
------- रावांची पत्नी झाले आजच्या शुभदिनी .



100. थोडा गुण सोन्याचा, थोडा गुण सोनाराचा ,
------- रावांनी केला माझा संसार सुखाचा .



No comments:
Post a Comment