1. बोलताना जिभेचा जाऊ देऊ नये तोल ,
----- रावांच्या प्रीती इतके नाही कशाचे मोल .


2. सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात ,
----- रावांचे नाव घेते ----- च्या घरात .


3. वडिलांची छाया आईची माया ,
----- रावांच्या सुखासाठी झिजवेन मी काया .


4. बहिणीसारख्या नंदा भावासारखे दिर ,
----- रावांचे नाव घेण्यासाठी झाले मी अधीर .


5. तिळ्गुळ घ्या गोड गॊड बोला ,
----- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला .


6. श्रीमंत असो वा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर ,
----- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर .


7. संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व ,
----- रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे महत्व .


8. खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुगंध ,
----- रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद .


9. कपाळावर कुंकु हिरवा चुडा हाती ,
----- राव माझे पती माझे भाग्य किती .


10. झाशीच्या राणीचा स्वातंत्र्यासाठी झाला घात ,
----- रावांचा जन्मोजन्मी धरीन मी हात .


11. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात ,
----- रावांचे नाव घेते ----- च्या अंगणात .


12. सौभाग्याचं लेणं काळी पोत ,
----- रावांच्या जीवनात उजळीन जीवनज्योत .


13. तुकारामांचा अभंग वामनांची कविता ,
----- राव आहेत सागर मी त्यांची सरिता .


14. श्रीमंत माणसांना पैशाची धुंदी ,
----- रावांचे नाव घ्यायची पहिलीच संधी .


15. काचेच्या ग्लासात चकचकते दही ,
माझ्या मंगळ्सुत्रावर ---------- रावांची सही .


16. तांब्याच्या पळीला नागाची खुण ,
---------- रावांचं नाव घेते ----------- घराण्याची सुन .


17. शंकराच्या पिंडीवर बेल वाह्ते वाकुन ,
----------- रावांच नाव घेते पुजेचा मान राखुन .


18. समुद्राला आली भरती नदीला आला पुर ,
----------- रावांसाठी माहेर गेले दुर .


19. माहेरचं निरंजन सासरची फुलवात------------- ,
रावांचं नाव घ्यायला करते आजपासुन सुरुवात .


20. मोर पक्षी पाण्याला हौशी ,
----------- रावांचं नाव घेते पुनवेच्या दिवशी .


21. दारी होती तुळस तिला घालते पळी - पळी पाणी ,
आधी होती आईबापाची तान्ही नंतर झाली --------- रावांची राणी .


22. गुलाबाच्या कळ्या पेटीत ,
------------ राव आहेत माझ्या मुठीत .


23. अबोलीचा गजरा रुपयाला एक ,
----------- रावांचं नाव घेते ----------------- घराण्याची लेक .


24. लाल मणी तोडले काळे मणी जोडले ,
------------ रावांसाठी आई-बाप सोडले .


25. साजुक तुपात नाजुक चमचा ,
-----------चे नाव घेते आग्रह तुमचा .


26. निळ्या आकाशात पक्षांची चाहूल ,
------------रावांच्या जिवनात टाकते मी पहीलं पाऊल .


27. वीटांवर वीटा शंभर वीटा ,
------------- राव आहेत माझ्याजवळ आता बाकी सर्वांनी फुटा .


28. हिमालयाच्या पर्वतावर बर्फ़ाच्या राशी ,
---------चे नाव घेते ग्रुह्प्रवेशाच्या दिवशी .


29. केळीचं पान कसं कुरुम कुरुम वाजतय ,
------- रावांचं नाव घ्यायला मला लाज वाटतेय .


30. इंग्लंड अमेरीका मी हाय कुमारीका ,
मला नाव घ्यायला सांगू नका .


31. नवरा बायकोचा विश्वास हाच सुखी संसाराचा मंत्र ,
--------- राव म्हणतात याच सुखासाठी सर्वांनी जपावे एकमेकांचे तंत्र .


32. साता जन्माचे सुख देवाने मला एका जन्मात दिलं ,
---------------- रावांबरोबर संसार करताना ते मी अनुभवलं .


33. उखाणा घेते भारतीय संस्क्रुतीचा माहिमा ,
-------- रावांचे नाव घेताच गाली चढे लाजेचा लालिमा .


34. ग्रीष्म रुतुत सुखावते आम्र व्रुक्षाची छाया ,
----------- रावांच्या बरोबर घातला मी संसाराचा पाया .


35. देणा-याने देत रहावे घेणा-याने घेत रहावे ,
--------- च्या संगतीत माझे आयुष्य फुलावे .


36. असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागेल माघार ,
----------- राव आहेत माझ्या जीवनाचा आधार .


37. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून ,
---------------- चे नाव घेते आपला मान राखून .


38. देवीच्या देवळात विजेचा झंकार ,
--------- चे नाव घेते हेच माझे अलंकार .


39. गीतात जसा भाव फुलात गंध ,
--------- बरोबर जुळले रेशमी बंध .


40. चंद्रतारांगणाच्या मेळाव्यात रजनी हसते ,
------- च्या सहवासात ------------रमते .


41. निरोपाच्या प्रांगणात पडला स्म्रुति पुष्पांचा सडा ,
-------- च्या सोबत चालले घेऊन आशिर्वादाचा धडा .


42. रातराणीच्या सुगंधाने निशीगंध झाला मोहित ,
मागते आयुष्य ---------- च्या सहित .


43. ह्रुदयरुपी शिंपल्यात प्रितिचे पाणि ,
------ च्या नावाने बांधले मंगल मणी .


44. मंगळ्सुत्र हा सौभाग्याचा अलंकार ,
-------च्या सह ध्येय आशा होवोत साकार .


45. मंगळ्सुत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा ,
------- चे नाव घेऊन मान राखते सर्वांचा .


46. हत्तीने केली मस्ती धुळीने भरले आकाश ,
--------- च्या चेहरयावर सदगुणांचा प्रकाश .


47. सोने हिरे माणिक मोत्यांनी घडविले जडावाचे डोरले ,
---------- चे नाव माझ्या ह्रुदयात कोरले .


48. बारामतीत आहे मोरोपंतांची आर्या ,
सर्वांसमोर नाव घेते ---------- ची भार्या .


49. विवाह म्हणजे सम्रुध्द सहजीवन ,
------- च्यामुळे झाले माझे जीवन नंदनवन .


50. बचत गटाच्या माध्यमातुन बांधते उत्कर्षांच्या भिंती ,
--------- चे नाव घेऊन करते एकात्मतेची क्रांती .


51. टिळकांचा केसरी अत्र्यांचा ललकार ,
------- रावांची विदवत्ता हाच माझा अलंकार .


52. कवींच्या कवितेत मोरोपंतांची आर्या ,
------- रावांचे नाव घेते ------- भार्या .


53. गणेशाला आवडती रक्तवर्ण कमळे ,
------- रावांसोबत माहेर विसरुन रमले .


54. चांदीच्या तबकात खडीसाखरेचे खडे ,
------- रावांचे नाव घेते गौरीहरापुढे .


55. सातासमुद्रापलीकडे राधा-क्रुष्णाचा खेळ ,
------- रावांचे नाव घेते सांयकाळची वेळ .


56. स्त्रियांचे कर्तव्य पतिसेवा हेच ,
------- रावांचे आयुष्य वाढो भुषण मला हेच .


57. नेत्राच्या निरांजनात प्रितीची वात ,
------- रावांच्या नावास केली सुरुवात .


58. रामाने राज्य दिले, भरताने नाकारले ,
------- रावांनी सौभाग्य दिले ते मी स्वीकारले .


59. मणीमंगळसुत्र सौभाग्याची खूण ,
------- रावांचे नाव घेते------- ची सून .


60. चांदीच्या तबकात हळदी कुंकवाचा काला ,
------- रावांच्या नावांस आरंभ केला .


61. भिल्लीणीच्या रुपाने शंकर झाले मोहीत ,
------- रावांचे नाव घेते सासुसास-यांसहीत .


62. जय जवान जय किसान गर्जतो सारा देश ,
------- रावांच्या जीवाकरिता घातला सौभाग्याचा वेष .


63. वडीलांचा आशिर्वाद मातेची माया ,
------- रावांसारखे पती मिळाले ही ईश्वराची दया .


64. काँग्रेसच्या पायात सत्याग्रहाची बेडी ,
------- रावांच्या जीवावर घातली मंगळ्सुत्राची जोडी .


65. दत्तात्रयाला शोभे गाय, महादेवाला शोभे नंदी ,
------- रावांच्या जीवावर मी आहे आनंदी .


66. तुळशीला घालते पाणी, विष्णूची करते शांती ,
------- रावांचे आयुष्य वाढो हीच ईश्वराला विनंती .


67. यमुनेकाठी क्रुष्ण खेळत होता बासरी ,
------- रावांमुळे आज मी आले सासरी .


68. अंगणी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी ,
------- रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी .


69. ज्योतीला मिळेल ज्योत त्यात पडेल प्रकाश ,
------- रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश .


70. गुलाबाचे फुल दिसायला छान ,
------- रावांचं नाव घेते ठेवते आपला मान .


71. चटक चांदणी शुभ्रतेची कला ,
------- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला .


72. कोवळया पालवीने लागते वसंताची चाहूल ,
------- रावांच्या संसारात टाकते मी पाऊल .


73. राम, लक्ष्मण निघाले सीता म्हणते मीही येते ,
------- रावांचे नाव तुमच्या आग्रहाकरिता घेते .


74. सागर सरिताच्या मिलनातुन उमलली कलीका ,
------- रावांचे नाव घेते -------- ची बालीका .


75. गुलाबाचे फुल तोडताना रुततो काटा ,
------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा .


76. सात पावले चालुन जाता स्वर्ग आले हाता ,
-------रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता .


77. पुर्वेकंडून आला वारा पश्चिमेकडून आला पाऊस ,
------- रावांनी केली नाही -------- हाऊस .


78. बालपण संपुन आलयं आता यौवन ,
------- रावांचे नाव घ्यायला कशाला हवं प्रयोजन .


79. सरस्वतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा ,
------- रावांच्या नावाने भरला हातभर चुडा .


80. न कळताच भातुकली संपुन स्वामिनी मी झाले ,
------- रावांच्या सहवासात आनंदाने न्हाले .


81. भरल्या ताटाला देते रांगोळीची शोभा ,
-------रावांच्या विद्येला आहे विनयाची प्रभा .


82. बालपण सारे बागडण्यात गेले, नकळत यौवनात पदार्पण झाले ,
------- राव मला पती मिळाले नी भाग्य माझे उजळुन निघाले .


83. संसाराच्या चौकोनाची केली पुर्तता ,
------- रावांचे नाव घेते तुम्हा सर्वा करिता .


84. आई वडीलांनी केले लग्न, लग्नानंतर केले कन्यादान ,
------- रावाना मिळाला -------- च्या जावयाचा मान .


85. श्री गजाननाला वंदन करुन पहिलं पाऊल टाकलं जपुन ,
------- रावांबरोबर चालता चालता देहभान गेले विसरुन .


86. अभिमान नसावा स्वरुपाचा गर्व नसावा पैशाचा ,
------- रावांचा शब्द नेहमीच असतो सुखाचा .


87. संसाराच्या अंगणात ऊन पावसाचा खेळ ,
-------रावांच्या अन माझ्या संसारी इंद्रधनुष्याचा मेळ .


88. तांब्याच्या संज्यापात्रात न्हानत होती श्रीक्रुष्ण कांत ,
-------रावांच्या मनाचा न लागे अंत .


89. सुखी माझ्या संसाराला नित्य लागे सांजवात ,
पावलो पावली मिळे मला ------- रावांची सुंदर साथ .


90. काचेच्या बशीत ठेवली बर्फी ,
------- रावांच्या नावासाठी सर्वांनी केली गर्दी .


No comments:
Post a Comment