1. आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकुळासारखे घर ,
-------- च्या आगमनाने पडली त्या सुखात भर .


2. चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण ,
-------- चे नाव घेऊन सोडतो आता कंकण .


3. पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय ,
-------- ला आवडते नेहमी दुधावरची साय .


4. संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी ,
-------- मुळे लागली मला संसाराची गोडी .


5. देवाजवळ करतो मी दत्ताची आरती ,
-------- माझ्या जीवनाची सारथी .


6. स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढविली शान ,
-------- चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान .


7. काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध ,
-------- सोबत जीवनात मला आहे आनंद .


8. नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व ,
-------- आहे माझे जीवन-सर्वस्व .


9. भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून ,
-------- चे नाव घेतो जरा पहा मागे वळून .


10. बहरली फुलांनी निशिगंधाची पाती ,
-------- चे नाव घेतो लग्नाच्या राती .


11. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ,
-------- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल .


12. आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा मान ,
-------- चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान .


13. देवळाला खरी शोभा कळसाने येते ,
-------- मूळे माझे ग्रुहसौख्य दुणावते .


14. अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा ,
-------- ला घास घालतो वरण-भात तुपाचा .


15. देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले ,
-------- शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले .


16. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण ,
-------- ला सुखात ठेवीन हा माझा पण .


17. टाळ चिपळयांचा गजर त्यामध्ये वाजे वीणा ,
-------- चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा .


18. नीलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी ,
-------- चे नाव घेतो -------- च्या घरी .


19. पर्जन्याच्या व्रुष्टीने स्रुष्टी होते हिरवी गार ,
-------- च्या गळयात घालतो मंगळ सुत्राचा हार .


20. चंद्राचा होता उदय समुद्राला येते भरती ,
-------- दर्शनाने सारे श्रम हरती .


21. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान ,
--------चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान .


22. चंद्राला पाहुन भरती येते सागराला ,
-------- ची जोड मिळाली माझ्या जीवनाला .


23. हिमालय पर्वतावर शंकर - पार्वतीची जोडी ,
-------- च्या जीवनात मला आहे गोडी .


24. जीवनात लाभला मनासारखा साथी ,
माझ्या संसार रथावर -------- सारथी .


25. जगाला सुवास देत उमलली कळी ,
भाग्याने लाभली मला -------- प्रेमपुतळी .


26. रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन ,
---------- च्या साथीनं आदर्श संसार करीन .


27. जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र ,
---------- च्या गळयात बांधतो मंगळसुत्र .


28. राधिकेला क्रुष्ण म्हणे हास राधे हास ,
मी देतो -------- ला लाडवाचा घास .


29. मायामय नगरी, प्रेममय संसार ,
---------- च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार .


30. सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग ,
---------- माझी नेहमी घरकामात दंग .


31. निसर्गावर करु पहात आहे आजचा मानव मात ,
अर्धांगिनी म्हणुन ---------- ने दिला माझ्या हातात हात .


32. सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रुप ,
---------- मिळाली आहे मला अनुरुप .


33. नाशिकची द्राक्षे, नागपुरची संत्री ,
---------- आज पासुन माझी ग्रुहमंत्री .


34. प्रसन्न वदनाने आले रविराज ,
---------- ने चढविला संसाराला स्नेहाचा साज .


35. तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधणारे होते कुशल ,
---------- चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल .


36. उभा होतो मळयात, नजर गेली खळयात ,
नवरत्नांचा हार ---------- च्या गळयात .


37. जाई जूई च्या फुलांचा दरवळला सुगंध ,
---------- च्या सहवासात झालो मी धुंद .


38. ---------- माझे पिता ---------- माझी माता ,
शुभमुहूर्तावर घरी आणली ---------- ही कान्ता .


39. श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल ,
---------- गेली माहेरी की होतात माझे हाल .


40. आंबागोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अम्रुत गोड ,
---------- चं नाव आहे अम्रुतापेक्षा गोड .


41. दारी होते कोनाडे त्यात होती पळी ,
माझी ---------- व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी .


42. संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका ,
---------- चे नाव घेतो सर्व जण ऐका .


43. कोरा कागद काळी शाई ,
---------- ला रोज देवळात जाण्याची घाई .


44. लग्नाचा वाढदिवस करु साजरा ,
---------- तुला आणला मोग-याचा गजरा .


45. अस्सल सोने चोविस कँरेट ,
---------- अन माझे झाले आज मँरेज .


46. जाईच्या वेणीला चांदीची तार ,
माझी ---------- म्हणजे लाखात नार .


47. सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल ,
संसार करु सुखाचा ---------- तु, मी आणि एक मुल .


48. काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात ,
प्रथम दर्शनीच भरली ---------- माझ्या मनात .


49. रुप्याचा लोटा सोन्याची झारी ,
असली काळीसावळी तरी ---------- मला प्यारी .


50. हत्तीच्या अंबारीला मखमली झुल ,
माझी ---------- नाजुक जसे गुलाबाचे फुल .


No comments:
Post a Comment