1. डोंगरकपारी तरु लतावेली ,
------- रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी .


2. उगवत्या रवीला उषेची ऒढ ,
------- रावांच्या संसारात लाभली ------- ची जोड .


3. गरिबीची करु नये निंदा, श्रीमंतीचा करु नये गर्व ,
------- रावांच्या नावावर आर्पिले जीवन सर्व .


4. शिवाजीसारखा पूत्र धन्य जिजाऊची कूशी ,
------- रावांचे नाव घेते बारशाच्य़ा दिवशी .


5. तारुण्याच्या वाटेवर बालपणाची झाली इतराजी ,
------- रावांच्या नावाने मिळाली नवलाई संसाराची .


6. माहेरचे प्रेम खेचती मागे पुढे ,
------- रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे .


7. प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी ,
------- रावांचे नाव घेऊन करते घरभरणी .


8. वर्षाऋतूच्या आगमनाने धरती होते हासरी ,
------- रावांचं नाव घेते मी नवपरिणिता लाजरी .


9. नभांगणी चांदणीला शोभा चंद्रमाची ,
सौभाग्याच्या दानात -----ला शोभा ------ रावांची .


10. सागराच्या लाटा उसळताना दिसती शुभ्रधवल ,
------- रावांचे नाव घेते, त्यात काय नवल ? .


11. भावंडाचा सहवास आईवडिलांचा आशिर्वाद ,
------- रावांचे नाव घेताना तुमचेही लाभो आशिर्वाद .


12. प्रतिभेच्या अविष्कारातून काव्य बहरे ,
------- रावांच्या साथीने मन माझे मोहरे .


13. हंडयावर हंडे सात हंडे त्यावर ठेवली परात ,
------- राव बसले दारात मी येऊ कशी घरात .


14. कवीची कविता कवीनेच वाचावी ,
------- रावांची प्रेमाची फुले ओंजळीत वेचावी .


15. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून ,
------- रावांचे नाव घेते तुमचा मान राखून .


16. चतूर्थीच्या दिवशी चंद्र निघाला हिरवा ,
------- राव बसले पुजेला मी निवडते दुर्वा .


17. गुलाबाचे फुल मधोमध पिवळे ,
------- राव दिसतात क्रुष्णासारखे सावळे .


18. हिमालय पर्वतातुन नदी वाहते कनिका ,
------- रावांचे नाव घेते ------ ची बालिका .


19. सायकल चालते वेगाने, बस धावते क्रमाने ,
------- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे .


20. करवंदाची साल चंदनाचे खोड ,
------- रावांचे बोलणे अम्रुतापेक्षा गोड .


21. इंग्रजी भाषेत पाण्य़ाला म्हणतात वाँटर ,
------- रावांचे नाव घेते ------- ची डाँटर .


22. आम के पेड पर बैठे थे बंदर ,
------- रावजी का घर है स्वर्ग से सुंदर .


23. पूर्णा नदीच्या काठावर क्रुष्णा वाजवितो बासरी ,
------- रावांसोबत आले मी सासरी .


24. मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची ,
------- राव आहेत तर कमी नाही कशाची .


25. आधुनिक स्वयंपाक घरात शोभते डायनिंग टेबल ,
------- रावांच्या नावासमोर माझ्य़ा गावाचे लागले लेबल .


26. आपले राष्ट्रगीत आहे जन - गण - मन ,
------- रावांना अर्पण केले तन - मन - धन .


27. चांदीच्या चमच्याने वाढते मी मीठ ,
घाबरु नका ------- रावांचा संसार करीन मी नीट .


28. मंदिराच्या गाभा-यात विठ्ठलाची मुर्ती,
------- रावांची होवो सगळीकडे किर्ती .


29. कशी बाई कोकीळा कुहू कुहू बोले ,
------- रावांनी आणली सोन्याची कर्णफुले .


30. पेरुची फोड दिली पिंज-यातल्य़ा पोपटाला ,
------- रावांचे नाव घेते चंद्र तारे साक्षीला .


31. मंद मंद गंध घेताना झाले मी धूंद ,
------- रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद .


32. गळयात मंगळसुत्र, मंगळसुत्रात डोरलं ,
------- रावांचे नाव माझ्या ह्रुदयात कोरलं .


33. सासु सास-यांनी काम केलं पुण्याचे ,
------- रावांना दान दिले मला जन्माचे .


34. पिवळा पितांबर श्रीक्रुष्णाच्या अंगावर घातला ,
------- रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला .


35. मंगलदेवी, मंगलमाते वंदन करते तुला ,
------- रावांचे नाव घेते अंखड सौभाग्य दे मला .


36. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले ,
------- रावांशी लग्न करुन मी सौभाग्यवती झाले .


37. नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार ,
------- रावांचा स्वभाव फारच उदार .


38. प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची ,
रावांच्या साथीने सुरूवात करते सहजीवनाची .


39. प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे ,
------- रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे .


40. निळया नभात चंद्राचा प्रकाश ,
------- रावांवर आहे माझा विश्वास .


41. इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग ,
------- रावांच्या संसारात मी आहे दंग .


42. शिक्षणाने विकसीत होते संस्कारीत जीवन ,
------- रावांच्या संसारात राखीन मी सर्वाचे मन .


43. सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा ,
------- रावांमुळेच लागला मला त्यांचा लळा .


44. मला गूणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकाला हेवा ,
------- राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा .


45. आज सारे सुख माझ्या दारी दाटले ,
------- रावांचे प्रेम अजून तरी नाही आटले .


46. मी नव्हती सुंदर तरी मला निवडले ,
------- रावांचे हेच रुप मला फार आवडले .


47. तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेलही शिंपडले ,
------- रावांचे मन मी केव्हाच जिंकले .


48. केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल ,
------- राव माफ करतात माझी प्रत्येक भुल .


49. पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल ,
------- रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल .


50. ------- रावांच्या नावाने भरला मी हिरवा चूडा ,
त्यांच्यावर करेन मी प्रेमाचा सडा .


51. पंढरपुरच्या यात्रेत हरीनामाचा गजर ,
------- रावांचे नाव ऐकण्यासाठी सर्वजण हजर .



52. श्रीक्रुष्णाच्या गळयामध्ये वैजयंतीमाला ,
------- रावांचे नाव घेते मंगल दिन आला .



53. आरक्त गालावर उमटले लज्जेचे भाव ,
------- रावांनी घेतला माझ्या अंतःकरणाचा ठाव .



54. सकाळच्या वेळी बागेत फुल तोडतो माळी ,
------- रावांचे नाव घेते आता तुमच्यावर आली पाळी .



55. यमुनेच्या तीरावर ताजमहालाची इमारत ,
------- रावांचे नाव घेण्यास नाही मी हरत .



56. महादेवाच्या पुढे असतो नंदी ,
------- रावांचे नाव घेऊन देते तुम्हांला संधी .



57. पहाटेच्या वेळी वारा वाहतो झुळझुळ ,
------- रावांचे नाव घेताना पैजंण वाजतात खुळ्खुळ .



58. चांदीच्या तांब्याला नागाची खुण ,
------- रावांचे नाव घेते ------- रावांची सून .



59. हिरवी बांगडी गुलाब दास ,
------- रावांच्या ताटापूढे अत्तराचा वास .



60. लाज-या राधिकेला कन्हैया म्हणतो हास ,
------- रावांना घालते लाडवाचा घास .



61. वसंत ऋतुत कोकीळा करते कुंजन ,
------- रावांच्या बरोबर करते लक्ष्मीपुजन .



62. चंद्राभोवती तारकांनी धरले गोल अंगण ,
------- रावांच्या नावाने बांधले मी कंकण .



63. जमीन दुभंगुन सीता झाली गुप्त ,
------- रावांनी हार घालुन आईवडिलांना केले मुक्त .



64. अम्रुत मुर्तीला स्वरुप देतो कलाकार ,
------- रावांचे सदगुण हेच माझे अलंकार .



65. हळद लावते किंचीत कुंकु लावते ठसठशीत ,
------- रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्व संचित .



66. सीतेच्या पर्णकुटीत लावल्या केळी ,
------- रावांचे नाव घेते पुजेच्या वेळी .



67. मेघरुपी पिंपातून टपटप पडतात मोती ,
------ रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती .



68. रुसलेल्या राधेला क्रुष्ण म्हणतो हास ,
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास .



69. संसाररुपी देवळात नंदादीप तेजावा समाधानाचा ,
------- रावांच्या पाठीशी आशिर्वाद असावा तुमचा .



70. यमुनेच्या डोहात क्रुष्णा वाजवी पावा ,
------- रावांच्या जीवावर संसार सुखाचा व्हावा .



No comments:
Post a Comment