1. स्वातंत्र्याच्या होमकूंडात विरांनी घेतली उडी ,
------- रावांच्या नावाने घालते गळयात मंगळसुत्राची जोडी .



2. नाजूक अनारसे साजूक तूपात मळावे ,
------- रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे .



3. चंदेरी सागरात रुपेरी लाटा ,
------ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा .



4. पौषातील धुंद वारा छेडितो माझ्या अंगाला ,
------- रावांचे नाव घेते सूर्यनारायणाच्या साक्षीला .



5. दीनदुबळयाचे गा-हाणे परमेश्वरांनी ऐकावे ,
------- रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे .



6. ग्रुहकामाचे शिक्षण देते माता ,
------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता .



7. शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल ,
------- रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल .



8. वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस ,
------- रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस .



9. अंगणात होती मेथी पाणी घालू किती ,
------- रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी .



10. डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल ,
------- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल .



11. ओल्याचिंब केसांना टाँवेल दया पुसायला ,
------- रावांचे नाव घेते शालू दया नेसायला .



12. डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले ,
------- रावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले .



13. गुलाबाचे फुल दिसायला ताजे ,
------- रावांचे नाव घेते सौभाग्य माझे .



14. अंगणी होती तुळस, तुळ्शीला घालत होती पाणी ,
आधी होती आईबापाची तान्ही नंतर झाली --------- रावांची राणी .



15. दारी होता टेबल त्यावर होता फोन ,
-------- रावांनी पिक्चर दाखविला हम आपके है कौन .



16. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार ,
------- रावांनी घातला मला मंगळ्सुत्राचा हार .



17. पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा ,
------- रावांनी आणला मला मोग-याचा गजरा .



18. चांदीचे जोडवे, पतीची खुण ,
------- रावांचे नाव घेते ------- ची सून .



19. नव्हती कधी गाठभेट एकदाच झाली नजरानजर ,
आई-वडिल विसरते ------- रावांसाठी सुटला प्रीतीचा पाझर .



20. ह्र्दयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात ,
------- राचांच्या जीवनात लावते प्रीतीची फुलवात .



21. नववधू आले मी घरी जीव गेला बावरुन ,
------- रावांनी मारली हाक शिणचं गेला निघून .



22. धरला यांनी हात वाटली मला भीती ,
हळूच म्हणाले -------- राव अशीच असते प्रीती .



23. जेव्हा मी यांना पाहते चोरुन विचार करते मुक होवून ,
घडविले देवांनी ------- रावांना जीव लावून .



24. घातली मी वरमाला हसले ------- राव गाली ,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली .



25. वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल ,
------- रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल .



26. राजहंस पक्षी शोभा देतो वनाला ,
------- रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला .



27. सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान ,
------- रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान .



28. आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे ,
------- राव हेच माझे अलंकार खरे .



29. पर्जन्याच्या व्रुष्टीने स्रुष्टी होते हिरवीगार ,
------- रावांच्या नावाने घालते मंगळसुत्राचा हार .



30. लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा ,
------- रावांचे नाव घेऊन उखाणा करते पूरा .



31. गौरीहर पुजले अन बोहल्यावर चढले ,
------- रावांच्या सुखासाठी संसारात गढले .



32. १२ वर्षे तुळशीला प्रेमाने घातले पाणी ,
देवतेच्या वरदानाने झाले ------- रावांची राणी .



33. ------- रावांची कन्या झाली ------- पंतांची सून ,
------- रावांच्या राज्य़ात नाही कशाची उण .



34. सौभाग्याचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे ,
------- रावांचे नाव घेते सुवासिनी पुढे .



35. काश्मीरच्या नंदनवनात नाचतो मोर ,
------- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर .



36. नागपुरची संत्री कोकणातले नारळ ,
------- रावांचे नाव घेते साधे आणि सरळ .



37. एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने ,
------- रावांचे नाव घेईन मी आवडीने .



38. प्रांजळपणे बोलणे, मनमोकळे हसणे ,
------- रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे ? .



39. पती पत्नी असतात सुखदुःखाचे साथी ,
------- रावांचे नाव घेते जगदंबे वरद हस्त असु दे माथी .



40. माहूर गडावर रेणुकेची वस्ती ,
------- रावांना मिळावे आयुष्य जास्ती .



41. पित्याने दिली विद्या मातेने दिले ग्रुहशिक्षण ,
------- राव मिळाले हेच माझे भुषण .



42. वसंत ऋतुच्या आगमनाने कोकिळा गाते गाणी ,
अर्पण करते आयुष्य ------- रावांच्या चरणी .



43. फुलला पळस रानोरानी, मोहरला आंबा पानोपानी ,
------- राव माझे धनी मी त्यांची अर्धांगिनी .



44. शितल आहे चंदन वारा आहे मंद ,
------- रावांना सिनेमाचा भारीव छंद .



45. आहे हौशी नणंद, प्रेमळ आहे जाऊ ,
------- रावांच्या गुणांचे गोडवे किती गाऊ .



46. गणपतीला दुर्वा, शिवाला बेल ,
------- रावांच्या संगतीत बहरली संसाररुपी वेल .



47. गुढीपाडव्याच्या सणाला पुरण्पोळीचा मान ,
------- रावांच्या सहवासात विसरते मी भूक तहान .



48. अमावस्येच्या रात्री चांदोबाचं लपणं ,
------- राव हेच माझं गुलाबी स्वप्न .



49. क्रुष्णाच्या हातात सोनेरी बासरी ,
------- रावांचे नाव घेताना सदा मी हसरी .



50. स्वप्नातला गुलाब गालात हसला ,
------- रावांचे नाव घेण्यास मान कसला .



51. आशिर्वादाची फुले वेचते वाकुन ,
------- रावांचे नाव घेते आपला मान राखून .



52. दत्तात्रयाचा अवतार ब्रम्हा, विष्णू, महेश्वर ,
------- रावांशी जुळले जीवनावे स्वर .



53. दया, क्षमा, शांती हेच सतीचे माहेर ,
------- रावांच्या चरणावर केला पंचप्राणांचा आहेर .



54. गौतमाची गौतमी, वसिष्ठांची अरुंधती ,
------- रावांची मी सौभाग्यवती .



55. ह्रदयरुपी शिंपल्यात प्रितीचे पाणी ,
------- रावांच्या नावाने बांधले मंगळमणी .



56. मंगळसुत्र हा सौभाग्याचा अलंकार ,
------- रावांच्यासह ध्येय आशा होवोत साकार .



57. मंगळसुत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा ,
------- रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा .



58. देवीच्या देवळात भोपी खेळतो पोत ,
------- रावांनी बांधली माझ्या गळयात मंगळसुत्राची पोत .



59. मंगळसुत्र हेच बायकांचे लेणे ,
------- रावांकरिता स्विकारले ------- घराणे .



60. अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसुत्र ,
------- रावांच्या हाती माझे जीवनसुत्र .



61. शिवाजीसारखा राजा गादीवर बसावा ,
------- रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा .



62. भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन ,
------- रावांचे नाव घेते --------- ची बहिण .



63. अत्तरदाणी गुलाबदाणी विडे ठेवले करुन ,
------- रावांना माळ घातली कुलदेवतेला स्मरुन .



64. सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे ,
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीपुढे .



65. गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले ,
------- रावांचे जीवनासाठी पुणे शहर पाहिले .



66. सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार ,
आणि ------- रावांच्या जीवासाठी केला संसार .



67. मोत्याचे पेले पाहून चंद्र सुर्य हसे ,
जमलेल्या मंडळीत ------- राव खासे .



68. काळया चंद्रकलेवर ता-यांसारख्या टिकल्या ,
------- रावांच्या मळयात खूप तूरी पिकल्या .



69. सागवान पेटीला सोन्याची चूक ,
------- रावांच्या हातात कायदयाचे बूक .



70. लहानश्या भिंती चित्रे काढू किती ,
सासुबाईच्या पोटी -------- राव मोती .



No comments:
Post a Comment