1. गानकोकीळ बालगंधर्व गाती सूरात ,
------- रावांचे नाव घेते ----- च्या घरात .


2. पुजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा ,
------- रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चूडा .


3. चांदीचा तांब्या, रुप्याची परात ,
------- रावांचे नाव घेते ----- च्या घरात .


4. झगमगीत दिव्यांच्या रोषणाईने सजली वरात ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या दारात .


5. राम लक्ष्मण जोडी अमर झाली जगात ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या घरात .


6. उत्तर दिशेला चमकतो अढळ ध्रुवतारा ,
------- रावांचा उत्कर्ष हा माझा अलंकार खरा .


7. काळसर आकाशात इंद्रधनूचे सात रंग ,
------- रावांचे नाव घेता मनी उठले तरंग .


8. सतारीचा नाद विणेचा झंकार ,
------- रावांच्या समवेत सुरू झाला संसार .


9. तळयातला राजहंस सुखवितो वनाला ,
------- रावांचे नाव घेते माझ्या मनाला .


10. मला नको हिरे माणिके, नको आकाशातले तारे ,
------- राव हेच माझे अलंकार खरे .



11. वेलदोडयाच्या वेलावर हवा सुटली गार ,
------- रावांचे नाव घेते रात्र झाली फार .


12. देवासमोर काढली रांगोळी मोराची ,
------- रावांचे नाव घेते स्नूषा थोरांची .


13. न चुकता टी. व्ही. वर बघत असते रामायण रविवारी ,
न कंटाळता ------- रावांचे नाव घेते ------- वारी .


14. विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी ,
------- रावांचे नाव घेते सा-यांसाठी .


15. लावीत होते कुंकु त्यात सापडला मोती ,
------- राव पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती .


16. जाई, जुई, चमेली, शेवंती, नागचाफा ,
------- रावांचे नाव घेऊन माळते सोनचाफा .


17. हिंदमातेच्या डोक्यावर सोन्याची जाळी ,
------- रावांचे नाव घेऊन बांधल्या मुंडावेळी .


18. सोन्याचं मंगळसुत्र सोनाराने घडवलं ,
------- रावांचे नाव घेताना ------- नी अडवलं .


19. सत्यभामेने श्रीक्रुष्णाची केली सुवर्णतुला ,
------- रावांचे नाव घेते आशीर्वाद दया मला .


20. समुद्राला कुणी म्हणे सागर, कुणी म्हणे रत्नाकर ,
------- राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर .


21. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा ,
------ रावांच्या नावाचा घालते सौभाग्याचा चूडा .


22. दहयाचे केले श्रीखंड, दूधाचा केला खवा ,
------- रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा .


23. केसात घालते फुल, डोळयात घालते काजळ ,
------- रावांचे नाव घेऊन वाहते फुलांची ओंजळ .


24. प्रीतीचा व निष्ठेचा पसरु दे सुगंध ,
------- रावांच्या जीवनात निर्मीन मी आनंद .


25. लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा मोडून कशी रूसू ,
------- रावांना घास देताना मला येई गोड हसू .


26. माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले ,
स्म्रुतीठेवा त्यांचा घेऊन ------- रावांच्या घरी आले .


27. हिरव्या हिरव्या रानात मोहक पिवळी फुले ,
------ रावांचे नाव घेताना मन हिंदोळयावर झुले .


28. गोपाळ क्रुष्णाला आहे बासरीचा छंद ,
------ रावांच्या जीवनात आहे मला आनंद .


29. कात, चुना, लवंग पानाचा विडा ,
------- रावांच्या नावाचा भरते लग्नाचा चूडा .


30. खवळला समुद्र लाटा काठोकाठ ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या पाठोपाठ .


31. रजनीचा भांडार शंशाकाच्या दारी खुले ,
माझे मानस मंदीर ------- रावांनी जिंकले .


32. पाटानं आणलं पाणी शेतं पिकली मोत्यावाणी ,
------- रावांच्या नावचं मोल आहे सोन्यावाणी .


33. आधी ताना आलापी मग गाऊ भैरवी ,
------- रावांच्या नावाची किती सांगू थोरवी .


34. राम, लक्ष्मण, सीता तीन मुर्ती साक्षात ,
------- रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात .


35. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर ,
------- रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर .


36. कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात ,
------- रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळयात .


37. अश्रुपूर्ण नेत्रांनी माहेरचा निरोप घेते ,
------- रावांच्या बरोबर मी ग्रुहप्रवेश करते .


38. स्वाती नक्षत्रातील थेबांचे शिंपल्यात होती मोती ,
------- रावांच्या संगतीत उजळली जीवनज्योती .


39. यज्ञ, धर्म, किर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती ,
------- रावांचे नाव हीच माझ्या मनाची त्रुप्ती .


40. टपोरा मोगरा फुलला छान ,
------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान .


41. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने, फुले ,
------- रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले .


42. काजव्यांचा प्रकाश दिसे अंधार आहे तोवर ,
------- रावांचे नाव घेते आग्रह आहे तोवर .


43. चंदनाच्या पेटीला सुवर्णाच्या चूका ,
------- रावांचे नाव घेते सा-यांनी ऐका .


44. सागराला आली भरती नदीला आला पूर ,
------- रावांच्या प्रीतीसाठी आई-वडिल केले दूर .


45. पौर्णिमेच्या चंद्राची उज्जवल प्रभा ,
------- राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा .


46. विवाहाच्या सोहळयात अत्तर गुलाबांचा थाट ,
------- रावांचे नाव घेऊन सोडते मुंडावेळीची गाठ .


47. दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस ,
------- रावांचे नाव घेते हळदी-कुंकवाचा दिवस .


48. अर्जुनाच्या रथाचे क्रुष्णाने केले सारथ्य ,
------- रावांच्या घरी करीन सर्वांचे अतिथ्य .


49. पारिजातकाचे फुल म्हणजे सौदर्याचे प्रतीक ,
थोरामोठय़ांच्या आशीर्वादाने लाभले ------- रावांसारखे पती .


50. प्रतिभेचा अविष्कार म्हणजे काव्य ,
------रावांच्या सहवासात आहे माझे भवितव्य .


51. कोजागिरी पौर्णिमा नी शरदाचे चांदणे ,
------- राव आहेत सर्वात देखणे .



52. रामाने केला शिवधनुष्य भंग ,
------- रावांच्या जीवनात झाले मी दंग .



53. श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून ,
------- रावांच्या नावाने आले माझे सौख्य फिरुन .



54. सागराच्या ह्रदयी अंतरंग लपले ,
------- रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले .



55. शशी-रजनी, रवी-उषेची नियतीने बांधली जोडी ,
------- रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी .



56. वरण भातावर धरली साजूक तूपाची धार ,
------- रावांना घास देताना तारांबळ झाली फार .



57. शब्द पाकळया मुक झाल्या ओठीचे उडले स्वर ,
------- रावांबरोबर चालले सुखी होवो माहेर .



58. निरोपाच्या प्रागंणात पडला स्म्रुती पुष्पाचा सडा ,
------- रावांच्या सोबत चालले घेऊन आशिर्वादाचा घडा .



59. चंद्रतारांगणाच्या मेळाव्यात रजनी हसते ,
------- रावांच्या सहवासात ------- रमते .



60. वसंत ऋतुत कोकीळा गाणे गातात ,
------- रावांच्या सहवासात दिवस आनंदात जातात .



61. नीलवर्ण आकाशात वीज कडाडली ढगात ,
------- रावांच्या सहवासात धन्य झाले मी जगात .



62. नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या ,
------- रावांचे नाव घेते --------- ची कन्या .



63. आंब्याच्या झाडाला आंबे लागले शंभर ,
------- रावांचे नाव घेते माझा पहिला नंबर .



64. सोन्याची घागर अम्रुताने भरावी ,
------- रावांची सेवा जन्मभर करावी .



65. गंगा वाहे यमुना वाहे सरस्वती झाली गुप्त ,
------- रावांच्या पदरी घालून आई बाबा झाले मुक्त .



66. तुकारामाने केले अंभग, मोरोपंतानी केली आर्या ,
------- रावांची कन्या झाली ------- रावांची भार्या .



67. शिवाजी राजांची जिजाई होती माता ,
------- रावांचे नाव घेऊन येते मी आता .



68. वेंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार ,
------- रावांना घालते पुष्पहार .



69. चातक पक्षी पावसाचे पितो पाणी ,
------- रावांची झाली मी राणी .



70. चांदण्या रात्री रातराणीचा सुवास ,
------- रावांचे नाव घेते खास .



No comments:
Post a Comment