1. चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात ,
--------रावांचे नाव घेऊन आजपासुन करते संसाराला सुरुवात .


2. -------- रावांच्या प्रेमाला जगात नाही तोड ,
प्रभुच्या चरणी प्रार्थना शेवट व्हावा गोड .


3. फुलफळांनी बहरलेली बाग सर्वानाच आवडे ,
-------- रावांचे नाव घेण्यात अविट गोडी वाटे .


4. नेत्रांच्या निरांजनात प्रितीची वात ,
-------रावांचे नाव घेऊन संसाराला करते सुरुवात .


5. नील नभांगण जणु अंगठी, चंद्र शोभे त्यातला खडा ,
ईश्वर सदा सुखी ठेवो -------- राव नी माझा जोडा .


6. नको मोहन माळ, नको हि-यांचा हार ,
-------- रावांच्या जीवनात मी सुखी फार .


7. नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी ,
-------- रावांचे नाव होते ओठावरती पण थांबले होते अखण्यासाठी .


8. ज्यांच्या सर्व्हिसला होल वर्ल्ड इज रेडी ,
-------- रावसाहेबांची मी ब्युटी फुल लेडी .


9. शाळेच्या ग्राऊंडवर खेळत होते गेम ,
तिकडुन आले -------- राव त्यांनी विचारले व्हाँट इज युवर नेम .


10. सुशील माझे सासु सासरे सुशील माझे माता पिता ,
-------- रावांचे नाव घेते -------- ची मी माता .


11. वैचारीक प्रगल्भतेचे -------- राव मला लाभले ,
म्हणूनी जीवनी स्वप्न माझे साकारले .


12. विचाराने सरळ मनाने निर्मळ -------- राव मला लाभले ,
सुर ताल मिळाल्याने जीवनी स्वर्ग अवतरले .


13. सप्तपदीच्या सात पावलांनी केली संसाराची नांदी ,
-------- रावांच्या संसारात राहीन मी आनंदी .


14. भवसागरात तरंगते संसाररुपी होडी ,
लक्ष्मीच्या क्रुपेने सुखी राहो -------- व -------- ची जोडी .


15. विनय हाच खरा स्त्रीचा अलंकार ,
-------- रावांच्या सहवासात होवो ध्येय-आशा साकार .


16. भुंग्याच्या सहवासात विकसते कळी ,
-------- रावांचे नाव घेते -------- च्या वेळी .


17. मंगळागौरीपुढे हळदी कुंकवाच्या राशी ,
-------- रावांचे नाव घेते -------- च्या दिवशी .


18. द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान ,
-------- रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान .


19. तबला वाजे, पेटी वाजे, छान वाजे वीणा ,
-------- रावांचे नाव घेते वन्दे मातरम म्हणा .


20. लग्न करुन आनंदाने संसार करते सुरु ,
-------- राव आहेत माझे प्राणपाखरु .


21. महादेवाला बेल, विष्णुला तुळस ,
-------- रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस .


22. रानातील मेवा पोपटाने खावा ,
-------- रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा .


23. लागताच वसंत ऋतुची चाहूल स्रुष्टी गेली खुलून ,
-------- रावांमुळे जीवन गेले माझे बहरुन .


24. खारकेच्या झाडावर चढला दोडक्याचा वेल ,
-------- रावांचे नाव घेते वाचवा इंधनाचे तेल .


25. म्रुगाच्या पावसाने पालटले वनश्रीचे रुप ,
-------- रावांचे नाव घेते व्रुक्षारोपण करुन वाचवा जमीनीची धुप .


26. रंगात रंग काळा, निळा, जांभळा, पिवळा ,
-------- रावांचे नाव घेते वेळेचे बंधन पाळा .


27. कुबेराच्या भांडारात हिरे-माणकांच्या राशी ,
-------- रावांचे चरण हीच माझी आयोध्या काशी .


28. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा ,
-------- रावांच्या राणीला मोत्यांचा चुडा .


29. दारापुढे व्रुंदावन त्यात तुळशीचे झाड ,
-------- रावांच्या गुणापुढे दागिन्यांचा काय पाड .


30. शंकराच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार ,
-------- रावांच्या जीवासाठी केला संसार .


31. युध्दामध्ये युध्द झाले महाभारती ,
-------- रावांच्या संसारात मी आहे सारथी .


32. आई वडीलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवांनी बांधल्या गाठी ,
माहेर सोडले -------- रावांच्या सौख्यासाठी .


33. राम गेले वना, राज्य दिले भरता ,
-------- रावांचे नाव घेते सर्वांकरीता .


34. शंकरासारखा पिता अन गिरजे सारखी माता ,
-------- रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता .


35. सव्वाकोस पसरला अंगरख्याचा घोळ ,
-------- रावांचे अक्षर जशी मोत्याची ओळ .


36. गणेशाच्या प्रेमाने सगळी विघ्न पळती ,
-------- रावांचे प्रेम पाहुन सवती मनात जळती .


37. चंदनाचे पाट त्याला सोन्याचे हुक ,
-------- रावांच्या हातात इंग्रजी चौथीचे बुक .


38. सत्य अहिंसा बापुंचे गिरवा धडे ,
-------- रावांचे नाव घेते ऐका बाई गडॆ .


39. लवंगीवाडी, बदामी बंगला ,
-------- रावांच्या प्रपंचात जीव माझा रंगला .


40. चांदीच्या भांडयात केशराचे पाणी ,
-------- रावांसारखा हूशार नाही कोणी .


41. अप्सरा मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला ,
-------- रावांचे गुण बघून अर्पण केली मला .


42. तारामती राणी, हरिशचंद्र राजा, रोहिदास पुत्र ,
-------- रावांच्या नावाने घातले मंगळसुत्र .


43. वाद्यामध्ये सुरेल वाद्य म्हणते बिन ,
-------- रावांच्या चरणी -------- बाई लीन .


44. संगमरवरी देवळात बसविली रामाची मुर्ती ,
-------- रावांशी लग्न झाले झाली इच्छापुर्ती .


45. शिवाजीसारखा पुत्र, जिजाबाईसारखी माता ,
-------- रावांचे नाव घेते आपणा सर्वांकरीता .


46. आधी घातला चंद्र्हार, मग घातली ठुशी ,
-------- रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी .


47. आपल्या देशात व्हावयाचा आपल्या भाषेचा मान ,
-------- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान .


48. देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले ,
-------- रावांशी लग्न होऊन मनोरथ पुर्ण झाले .


49. विवेकी लोकांच्या समुदयात विद्वांनाचा मान ,
-------- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान .


50. सासर-माहेर घराणे आहे कुलीन ,
-------- रावांच्या सहवासात मी राहीन लीन .


51. स्त्रीला भुषविते तिची शालीनता ,
-------- रावांच्या सहवासात करीन कर्तव्यतत्परता .


52. सागर मिलनास उत्सुक होते सरिता ,
-------- रावांच्या जीवनात सौभाग्याची पुर्तता .


53. रुप गुण संपदेच्या जोडीला हवे चारित्र्य ,
-------- रावांच्या नावात आहे पावित्र्य .


54. अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान ,
-------- रावांच्यामुळे मिळाला सौभाग्याचा मान .


55. सडा समार्जनाबरोबर तुळशीला घालावे पाणी ,
-------- रावांचे नाव घेते जमल्या सा-या मैत्रिणी .


56. प्रभात समय सुखावतो गाता भुपाळी ,
-------- रावांचे नाव घेते -------- च्या वेळी .


57. संध्या समयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव ,
सर्वांच्या आग्रहास्तव घेते -------- रावांचे नाव .


58. मनाला समाधान देते देवापुढची सांजवात ,
संसाराच्या सुखी वाटचाली करीता -------- रावांच्या हाती दिला हात .


59. तिळगुळाच्या देवघेवीनं द्रुढ होतं प्रेमाचं नातं ,
-------- रावांचे नाव घेते आज आहे मकर सक्रांत .


60. तिळाची माया गुळाची गोडी ,
परमेश्वरा सुखी ठेव -------- राव नी माझी जोडी .


61. भुतदया आहे संताची शिकवण ,
-------- रावांच्या ह्रदयी प्रितीची साठवण .


62. नुतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा ,
-------- रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा .


63. वसंत चाहूली हळदी कुंकु करतात सुवासिनी ,
-------- रावांनी भरला आनंद जीवनी .


64. सावित्रीच्या पुण्याईने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म ,
-------- रावांचे सौभा़ग्य छ्त्र लाभॊ जन्मोजन्म .


65. पंचमीचा सण आला की हलतात हिंदोळे ,
-------- रावांच्या सहवासात माझे आनंदी मन खेळे .


66. माहेरच्या मायेला नाही कशाची सर ,
-------- रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर .


67. श्रावण महिना म्हणजे सणांची सुरुवात ,
------- रावांचे नाव घेते वरात आली घरात .


68. श्रावणात हिरवा साज स्रुष्टिदेवी सजली ,
-------- रावांच्या सौख्यास्तव मंगळागौर पुजली .


69. वर्षाऋतुच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती ,
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री .


70. सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत तेलाने तेवते ,
------- रावांना दिर्घायुष्य मंगळगौरीस मागते .


No comments:
Post a Comment