1. नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला ,
----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला .


2. पोपटाची हाक ऐकून मैना लागली डाळींब सोलायला ,
----- रावांचे नाव घेऊन मी लागले माणिकमोती वेचायला .


3. साता-याचे पेढे, नाशिकचा चिवडा ,
----- रावांची निवड हाच माझा निवाडा .


4. व्रुंदावनी कोणी बाई तुळस लाविली ,
----- रावांच्या संसारात आहे शीतल सावली .


5. ध्येय, प्रेम, आकांक्षांची जिथे होतसे पूर्ती ,
अशा ----- रावांची माझ्या मनी मूर्ती .


6. अमेरीकेत आहे न्यायदेवतेचा पुतळा ,
----- रावांचे नाव घेते मला सांभाळा .


7. उगवला सायंतारा, रातराणी बहरली ,
----- रावांचे नाव घेते वरात दारी आली .


8. स्वप्नपूर्तीच्या क्षणी आळविते केदार ,
----- रावांच्या मुळे मला मिळाले घरदार .


9. सावळ्या ढगांना सोनेरी कडा ,
----- रावांच्या हातांचा माझ्याभोवती वेढा .


10. प्रेमरुपी नंदादिपात लावते प्रितीची फुलवात ,
----- रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात .


11. इग्रंजी भाषेत भिंतीला म्हणतात वाँल ,
---- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल .


12. अशोकवनात लावली केळी ,
----- रावांचे नाव घेते संध्याकाळच्यावेळी .


13. यमुनेच्या काठी क्रुष्ण खेळत होता खेळ ,
----- रावांचे नाव घेते संध्याकाळचीवेळ .


14. इग्रंजी भाषेत चाकुला म्हणतात नाईफ ,
----- राव माझे हजबन्ड मी त्यांची वाईफ .


15. गुलाबाचे झाड फुलांनी वाकले ,
----- रावांमुळे सासरी पाऊल टाकले .


16. लग्नप्रसंगी लोक करतात आहेर ,
----- रावांसाठी सोडले आईवडिल अन माहेर .


17. अमरावतीच्या अंबादेवीला सोन्याचा साज ,
----- रावांबरोबर शुभमंगल झाले आज .


18. पाटल्या केल्या हात दिसे सवाई ,
वडिलांनी माझ्या ----- रावांना केले जावई .


19. जोडवी केली, तोरडया केल्या, नथ केली जाईची ,
----- रावांसाठी आशा सोडली मी माझ्या आईची .


20. मिठाचा सत्याग्रह झाला समुद्राकाठी ,
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी .


21. भाऊ माझा दादा, बहिण माझी ताई ,
----- रावांसाठी सोडली प्रेमाची आई .


22. असंख्य तारे नभात पाहावेत निरखून ,
----- रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून .


23. काचेच्या पेल्यात सुखदुःखाचं पेय ,
----- रावांना किर्ती मिळावी हेच माझे ध्येय .


24. द्वारकेत क्रुष्ण, अयोध्येत राम ,
----- रावांचे चरण हेच माझे चारही धाम .


25. कुबेराच्या भांडारात हिरे-माणकांच्या राशी ,
----- रावांचे नाव हिच माझी अयोध्या काशी .


26. नाशिक केले, पंढरपूर केले, करायची राहिली काशी ,
----- रावांचे नाव घेते ----- ची भाची .


27. काचेच्या अलमारीत गणपतीची मुर्ती ,
----- राव बसले पुजेला मी ओवळते आरती .


28. सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी ,
----- राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी .


29. हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम ,
----- रावांचे चरण हेच माझे चारही धाम .


30. सासु-सासरे ज्ञानी, आई-वडिल सदगुणी ,
----- रावांच्या नावाने गळ्यात घातले काळे मणी .


31. अडचणीच्या वेळी कामात पडते साठवण ,
----- राव इथे नसले कि त्यांची येते आठवण .


32. २०० शे ची दमनी, ३०० चा बिछाना ,
----- राव बसले धुरीवर चंद्र सुर्य दिसेना .


33. काचेची बांगडी केसापेक्षा बारीक ,
----- रावांचे नाव घेते आज आहे ----- तारीख .


34. आता वाजले सहा ,
----- राव म्हणतात माझ्याकडे एकदा तरी पहा .


35. चांदीची कुयरी हळदी कुंकवाने भरावी ,
----- रावांची सेवा जन्मोजन्मी घडावी .


36. चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप ,
----- रावांसाठी केले अठरा वर्षे तप .


37. पोथी, पुराणे वाचून बोध होतो मनाला ,
----- रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या सणाला .


38. चिकन सुपारी फोडावी दाताने ,
----- रावांचे काकण सोडावे उजव्या हाताने .


39. रिमझीम पाऊस पडे मोत्याचा सुटला वारा ,
----- रावांच्या घरी येताना डोळयाला लागतात धारा .


40. सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा ,
----- राव अन माझा जन्माचा जोडा .


41. नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा ,
----- रावांच्या संगतीत संसार करते सुखाचा .


42. श्रीमतांची श्रीमंती, गरीबाचा देव वाली ,
----- रावांचे नाव घेऊन मी झाले भाग्यशाली .


43. सोन्याचे तबक चांदीची परात ,
----- रावांचे नाव घेते नव्या घरात .


44. संगीत नाटकात नाटक सुभद्राहरण ,
----- रावांचे नाव घ्यायला हरतालिकेचे कारण .


45. कस्तुरीचा जन्म सुगंधाकरीता ,
माझे जीवन ----- रावांकरीता .


46. वडिलांनी केले लग्न, मामानी केला आहेर ,
----- रावांसाठी सोडले प्रेमाचे माहेर .


47. हूरहूर दाटली मनात, जीव माझा बावरला ,
----- रावांच्या ओढीनं माहेरचा मोह सोडला .


48. गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाब कळी ,
----- रावांचे नाव घेते ----- च्यावेळी .


49. सासुबाई आहेत प्रेमळ, सासरे आहेत दयाळू ,
------ राव तर आहेत अतिशय मायाळू .


50. चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा ,
----- रावांसारखा गुणी पती जन्मोजन्मी मिळावा .


51. नेत्रीच्या निराजंनात तेवते प्रितीची फुलवात ,
------- रावांच्या साथीने संसाराला करते सुरवात .


52. यौवनात पदार्पण केले सरले माहेरचे अंगण ,
------- रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण .


53. संसाररुपी कांदबरीत रेखल्या भावनेच्या ओळी ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या वेळी .


54. सागराला भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता ,
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता .


55. लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी ,
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता .


56. भवसागरात तरंगते संसाररुपी नौका ,
------- रावांचे नाव घेते सर्वजण ऐका .


57. आहा रे जीवा करु नको हेवा ,
------- रावांच्या चरणांची करेन सेवा, तर मिळेल मोक्षाचा ठेवा .


58. भक्तांच्या भेटीसाठी वेडा झाला नंदाचा नंदन ,
------- रावांचे नाव घेऊन मंगळागौरीला करते वंदन .


59. घना निळा सुसाट वारा ,
------- राव छेडीती माझ्या ह्रदयाच्या तारा .


60. सासरी आहेत माझ्या सासु-सासरे अन दीर ,
------- रावांना आवडते रव्याची खीर .


61. दोन वाती, दोन ज्योती, दोन शिंपले दोन मोती ,
------- रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती .


62. नयन रम्य बागेत नाचत होता मोर ,
------- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर .


63. नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले सात ,
------- रावांची अन माझी जन्मोजन्मीची साथ .


64. निळया निळया आकाशी उगवला शशी ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या दिवशी .


65. झुळझुळ वाहे चंद्रभागा, मंद चाले होडी ,
परमेश्वरा सुखी ठेव माझी अन -------- रावांची जोडी .


66. चांदीच्या निरंजनात मनोभावे लावते फुलवात ,
------- रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात .


67. फुलात फुल जाईचे, प्रेमात प्रेम आईचे ,
------- राव आहेत माझ्या प्रितीचे .


68. घरावर परडं, परडयात गहू ,
तुमच्या आग्रहासाठी ------- रावांचं नाव किती वेळा घेऊ .


69. कांजीवरम साडी बनारसी खण ,
------- रावांचं नाव घेते आज आहे ------- सण .


70. केस माझे कुरळे सावली पडली गालावर ,
------- रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या बोलावर .


71. तांब्याच्या घागरी चकचक घासल्या ,
------- रावांच्या बहिणी तबला पेटीवर नाचल्या .


72. राम, लक्ष्मण, सीता तीन मुर्ती साक्षात ,
------- रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात .


73. संसारात करावी लागते सगळयांनाच तडजोड ,
पण ------- रावांची लाभली छान मला जोड .


74. आता निघाल्या प्लास्टीकच्या खुर्च्या ,
------- रावांच्या बहिणी जशा खुरासनी मिरच्या .


75. माहेत सोडून येताना डोळयात आसू ,
------- रावांच्या प्रेमळ संसारात ओठावर असतं हासु .


76. सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा ,
------- राव सुखी राहोत हिच माझी इच्छा .


77. पुजा केली मनोभावे, गौराई म्हणे काय हवे ,
------- राव नी माझ्य़ा संसाराला देवी तुझे आशीर्वाद हवे .


78. दाग नको, दागिना नको, नको चंद्रहार ,
------- रावांचं नाव हाच माझा अलंकार .


79. परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने ,
------- रावांच्या क्रुपेने लाभले सौभाग्याचे लेणे .


80. मंगळसुत्राच्या वाटयांनी जोडले सासर माहेर ,
------- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर .


81. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत ,
------- रावांच्या छायेत झाले मी ही भाग्यवंत .


82. ऋण काढून सण करणे आहे दुषण ,
------- रावांचे नाव हेच माझे भुषण .


83. संसाराच्या आमच्या कसलीच नाही वाण ,
------- राव म्हणजे रुप-गुणांची खाण .


84. क्रुष्ण म्हणतो राधेला आता जरा हास ,
------- रावांना घालते ------- चा घास .


85. गौतमाच्या शापाने अहिल्या झाली पाषाण ,
------- रावांचे नाव घेते सौभाग्य हेच माझे निशाण .


86. शरदाच्या चांदण्यात चंद्र करतो अम्रुताचा वर्षाव ,
------ रावांच्या यशाने झालाय त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव .


87. सासु-सास-यांच्या छायेत मला नाही कशाची कमी ,
------ राव हेच माझे सर्वस्वाचे स्वामी .


88. चांदीच्या अडकित्याला हिरेमोती जोडले ,
------ रावांसाठी आई वडिल सोडले .


89. ------ रावांच्या कर्तुत्वाची पाहून चढती कमान ,
त्यांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान .


90. राम, लक्ष्मण, सीता तिघे निघाले वनी ,
------- रावांचे नाव पडो सर्वांच्या कानी .


91. निसर्गाला कधी नाही अंत ,
------- राव आहेत मला मनपसंत .


92. सर्वस्वाचे देऊन दान मुक्त मी झाले ,
------- रावांच्या सहवासात आनंदाने न्हाले .


93. घराला होती खिडकी, खिडकीत होती वीट ,
------- रावांना झाली दिठ तर चपलीत केली नीट .


94. चेहरा आहे मानवी मनाचे दर्पण ,
------- रावांना केले मी सर्वस्व अर्पण .


95. सुखी माझ्या संसार वेलीवर डोलताहेत दोन सुंदर फुलं ,
------- रावांनी माझ्या सुखाचं केलं नव दालन खुलं .


96. मातापित्यानी वाढवलं मनासारखे शिक्षण दिलं ,
सर्व सुखाच्या संसारात ------- रावांनी मला स्वामिनी केलं .


97. अजान व्रुक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचून केली किर्ती ,
------- रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी .


98. छोटसं घरकुल माझं सामावून घेते सा-यांना ,
------- रावांची प्रेमळ साथ त्रुप्त करते मनाला .


99. हळद लावते कुंकु लावते वाण घेते घोळात ,
------- रावांचे नाव घेते सवासिनींच्या मेळयात .


100. वसंताच्या चाहूलीने कोकीळा लागते गाऊ ,
------- रावांच्या नावाचा नाही वाटत बाऊ .


No comments:
Post a Comment