1. अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा ,
-------रावांना घास घालते वरण भात तुपाचा .


2. यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली ,
------- रावांची जन्मदाती, धन्यती माऊली .


3. श्रीक्रुष्णाच्या मस्तकावर सदैव असतो शेष ,
------- रावांचे नाव घेऊन करते मी ग्रुहप्रवेश .


4. शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकून ,
------- रावांचे नाव घेते सर्वाचा मान राखून .


5. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ,
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल .


6. पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रपणे वागते ,
------- रावांचे नाव घेताना आशिर्वाद मागते .


7. अंगणात व्रुदांवन, व्रुदांवनात तुळस ,
------- रावांचे नाव घेताना कसला हो आळस .


8. संसाररुपी वेलीचा गगनात केला झुला ,
------- रावांचे नाव घेते आशिर्वाद दयावा मला .


9. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा ,
------- रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा .


10. कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती ,
------- राव माझे पती सांगा माझे भाग्य किती .


11. सनई आणि चौघडा वाजे सप्तसूरात ,
------- रावांचे नाव घेते ------ च्या घरात .


12. मंदीराचे वैभव परमेश्वराची मुर्ती ,
------- रावांचे नाव घेऊन करते इच्छापुर्ती .


13. पंचपक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे ,
------- रावांचे नाव घेताना कशाला आढे वेढे .


14. मला नाही काही येत मी आहे साधी ,
------- रावांचे नाव घेते सर्वाआधी .


15. रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा ,
------- रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा .


16. कपाळाचं कुंकु जसा चांदण्याचा ठसा ,
------- रावांचे नाव घेते सारेजण बसा .


17. माहेर तसं सासर नाते संबंधही जुने ,
------- राव आहेत सोबत मग मला कशाचे उणे .


18. गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी ,
------- रावांचे नाव घेते ------- दिवशी .


19. छ्न छन बांगडया, छूम छूम पैंजण ,
------- रावांचे नाव घेते ऐका सारेजण .


20. ह्र्दयाच्या भावनांना प्रितीचा फुलोरा ,
------- रावांच्या सह फुलो सौख्याचा फुलोरा .


21. शाहू राजे बांधतात कोल्हापूरी फेटा ,
------- रावांच्या संसारात आहे माझा अर्धा वाटा .


22. हिरवा शालू नेसून आले ,
------- रावांच्या जीवनात समरस झाले .


23. दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी ,
------- रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावेळी .


24. काचेच्य़ा तांब्यात सरबत आहे गार ,
------- रावांचे नाव घ्यायला उशीर झाला फार .


25. मोहमाया प्रेमाची जाळी पसरली दाट ,
------- रावांची सेवा करणे हीच माझी मोक्षाची वाट .


26. चाफळया मंदीरात राम, सीता, लक्ष्मण ,
------- रावांचे नाव घेऊन घालते आपोषण .


27. प्रेमाचा दिला हूंडा मानाची केली करणी ,
------- रावांचे नाव घेऊन करते घरभरणी .


28. सासु सासरे प्रेमळ जावा दीर हौशी ,
------- रावांचे नाव घेते ------- च्या दिवशी .


29. निशिगंधाच्या वासाने मन झाले मोहीत ,
------- रावांचे नाव घेते ------ सहीत .


30. जात होते फुलाला पदर अडकला वेलीला ,
लिंबलोण कुणाला तर ------ रावांच्या गुणाला .


31. यमुनेच्या तिरावर क्रुष्ण वाजवतो पावा ,
------- रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वाद हवा .


32. सोनाराने मंगळ्सुत्र घडवले सोन्याच्या साखळीवर ,
------- रावांचे नाव माझ्या ह्रदयाच्या पाकळीवर .


33. कबीर विणतो शेला देव घालतो घडी ,
------- रावांच्या जीवावर मी घालते मंगळसुत्राची जोडी .


34. दया, क्षमा, शांती प्रेमाचे माहेर ,
------- रावांनी केला सौभाग्याचा आहेर .


35. एक पाय ठेवते तळयात, एक पाय ठेवते मळयात ,
------- रावांचे नाव घेते सासरच्या मेळयात .


36. अमुल्य वेळी उमलली कळी ,
------- रावांचे नाव घेते सायंकाळच्या वेळी .


37. देहरूपी निरंजनात प्रेमरूपी वात ,
------- रावांचे नाव घ्यायला आज केली सुरूवात .


38. शुभमंगलप्रसंगी गणेशाची साथ ,
------ रावांचे नाव घ्यायला आज केली सुरूवात .


39. श्रीमंतीने दाखवू नये श्रीमंती, गरीबांना दयावी सवलत ,
------- रावांची विद्वता हीच माझी दौलत .


40. श्रावणी सरी नंतर प्रुथ्वीची काया ,
------- रावांच्या घरी मिळते माहेरची माया .


41. सुवासिक पारिजात बहरो प्रितीच्या दारी ,
------- रावांसाठी माहेर सोडून आले मी सासरी .


42. १९४७ पुर्वी भारतात माजली होती आंदा-धुंदी ,
------- रावांना घास घालते बासुंदी .


43. ल्याले मी आज सौभाग्याचा साज ,
------- रावांचे नाव घेते नववधु रुपाने आज .


44. नागिणीच्या वेलीखाली हरीणी घेते विसावा ,
------- रावांचे नाव घेते शुभार्शिवाद दयावा .


45. परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार ,
------- रावांच्या जीवनात मी आहे साथीदार .


46. काव्य तेथे कविता सागर तेथे सरिता ,
------- रावांचे नाव घेते तुमच्या इच्छेकरिता .


47. सातासमुद्रापलीकडे सापडतात शिंपलेमोती ,
------ रावांचे नाव घेते तुमचा मान राखूनी .


48. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून ,
------ रावांचे नाव घेते तुमचा मान राखून .


49. गर्व नसावा पैशाचा, अभिमान नसावा रुपाचा ,
-------रावांना घास घालते वरण भात तुपाचा .


50. जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फुल विचाराचा ,
------ रावांसह सुखी होईल प्रवाससंगीत संसाराचा .



51. दस-याच्या सणाला केला साखरभात ,
------- रावांचे नाव घेते --------- पंतांची नात .



52. कँप्टन लक्ष्मी नेताजी सुभाषचंद्र बोस ,
------- रावांचे नाव घेऊन जयहिंदचा करु घोष .



53. दवबिंदुचा जन्म आहे विरण्यासाठी ,
------- रावांशी लग्न केले मी सुख जोपसण्यासाठी .



54. आल वारा, गेला वारा रुपये घ्या पारखून ,
राजाच्या दरबारी --------राव कारकून .



55. पूण्यात जन्मले, गंगेत न्हाले ,
आणि -------- रावांच्या जीवासाठी मुबंईत आले .



56. सोन्याची पेटी सदरेला दाटी ,
------- राव बसले पेढीवर तेथे राजा आला भेटी .



57. पाण्याच्या हंडयावर फुलांचे झाकण ,
------- रावांच्या हातात सोन्याचे कंकण .



58. झिरी मिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा ,
------- रावांच्या छत्रीला मोत्यांचा तुरा .



59. गंधाने भरली कपोळ त्यात पडली समुर ,
आणि ------- च्या घराण्यात -------- राव चतुर .



60. दारी होती तुळस तिला घालीत होते पळी पळी पाणी ,
आधी होते आई-बाबांची तान्ही, मग झाले -------- रावांची राणी .



61. साजुक तुपात नाजुक चमचा ,
-------- रावांचे नाव घेते आग्रह तुमचा .



62. अबोलीचा गजरा रुपयाला एक ,
-------- रावांचं नाव घेते -------- घराण्याची लेक .



63. ज्याचा जसा भाव तसा त्याला देव दिसे ,
-------- रावांची प्रतिमा नेहमी माझ्या मनी वसे .



64. शुटींग, शर्टींग, कटपिसेस ,
-------- राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस .



65. सुर्याला कुणी म्हणतात रत्नाकर, कुणी म्हणतात भास्कर ,
-------- राव माझे जन्मोजन्मीचे प्रियकर .



66. संसार रुपी करंडा मनोरुपी झाकण ,
-------- रावांचे नाव घेते आर्शिवाद द्यावा आपण .



67. एकदानी केली बिंदी केली करायची राहिली सरी ,
-------- रावांच्या नावासाठी काळी पोत बरी .



68. शेगावच्या गजानना वंदन करते तुला ,
-------- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला .



69. मंदिरात वाहते फुल आणि पान ,
-------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान .



70. चंद्राचा झाला उदय अन समुद्राला आली भरती ,
-------- रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती .



No comments:
Post a Comment