1. ता-यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं ,
-------- मी जीवनसाथी म्हणून निवडलं .



2. विज्ञान युगात माणुस करतोय निसर्गावर मात ,
-------- चा अर्धांगिनी म्हणुन घेतला मी माझ्या हातात हात .



3. चंद्र आहे चांदणीचा सांगाती ,
-------- आहे माझी जीवनसाथी .



4. चौकोनी आरशाला वाटोळी फ़्रेम ,
माझ्या लाडक्या -------- वर माझे खरे प्रेम .



5. निसर्गाला नाही आदी नाही अंत ,
------- आहे माझ्या मनपसंत .



6. चित्रकाराने केली फ़लकावर रंगाची उधळण ,
-------- चे नाव भासे जणू माणिक मोत्यांची उधळण .



7. कपाळाचे कुंकु जशी चंद्राची कोर ,
-------- च्या मदतीवर माझा सगळा जोर .



8. पुणं तिथं का उणं म्हणतात सारी जणं ,
-------- न केलं सार्थ माझं जिणं .



9. कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध ,
-------- च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद .



10. खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड ,
-------- च्या रुपात नाही कुठेच खोड .



11. श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी ,
-------- चे नाव घेण्याची ही पहिलीच संधी .



12. रसाळ पाहिजे वाणी स्त्री पाहिजे निर्मला ,
-------- च्या नावाचा लागला मला जिव्हाळा .



13. हि-याचा कंठा मोत्याचा घाट ,
-------- च्या हौशीसाठी केला सगळा थाट .



14. गुलाबाचे फ़ुल गणपतीला वाहीले ,
-------- च्या साठी -------- गाव पाहीले .



15. आंबे वनात कोकीळा गाते गोड ,
-------- आहे माझ्या तळहाताचा फ़ोड .



16. लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा ,
-------- च्या रुपापुढे अप्सरेचा काय तोरा .



17. मुखी असावे प्रेम हातामध्ये दया ,
-------- सोबत जडली माझी माया .



18. वरमथळा खाली बातमी, वर्तमान पत्री रीती ,
-------- चे नाव घेतो अजोड आमची प्रीती .



19. रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा ,
जीवनाचा खेळ समजला -------- मुळे सारा .



20. इंद्राची इंद्रायणी, दुष्यंताची शकुंतला ,
-------- नाव ठेवले माझ्य़ा प्रिय पत्नीला .



21. नंदनवनीच्या कोकीळा बोलती गोड ,
-------- राणी माझा तळहाताचा फोड .



22. नंदनवनात अम्रुताचे कलश ,
-------- आहे माझी खुप सालस .



23. देवाला भक्त करतो मनोभावे वंदन ,
-------- मुळे झाले संसाराचे नंदन .



24. भाजीत भाजी मेथीची ,
-------- माझी प्रीतीची .



25. दही चक्का तुप ,
-------- आवडते मला खुप .



26. हिरवळीवर चरती सुवर्ण हरिणी ,
-------- झाली आता माझी सहचारिणी .



27. आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल ,
--------रावांच्या जीवनात -------- राहील खुशाल .



28. आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुंजन ,
माझ्या नावाचे -------- करी पुजन .



29. श्रीक्रुष्णाने केला पण क्रुष्णालाच वरीन ,
-------- च्या सोबर आदर्श संसार करीन .



30. चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा ,
-------- रावांच्या जिवावर -------- मारते मौजा .



31. सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली ,
-------- राणी माझी घरकामात गुंतली .



32. रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे ,
-------- ला पाहुन चंद्र सुर्य हसे .



33. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले ,
-------- चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले .



34. ह्रदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात ,
-------- च्या जीवनात लाविली मी प्रितीची फुलवात .



35. मातीच्या चुली घालतात घरोघर ,
-------- झालीस माझी आता चल बरोबर .



36. सुर्याने दिली साडी चोळी आणि गोफ ,
-------- रावांच्या मांडीवर -------- घेते झॊप .



37. सर्वऋतुत ऋतु आहे वसंत ,
-------- केली मी पत्नी म्हणुन पसंत .



38. इंग्रजी भाषेला महत्व आले फार ,
-------- ने लावला माझ्या संसाराला हातभार .



39. गंगेची वाळू चाळ्णीने चाळू ,
चलचल -------- आपण सारीपाट खेळू .



40. नभांगणी दिसे शरदाचे चांदणे ,
-------- चे रुप आहे अत्यंत देखणॆ .



41. शंकरासारखा पिता अन पार्वती सारखी माता ,
-------- राणी मिळाली स्वर्ग आला हाता .



42. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ,
-------- च्या गळयात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने .



43. वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर ,
-------- आहे माझी सर्वापेक्षा सुंदर .



44. पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडु पेढे ,
-------- चे नाव घेताना कशाला हवे आढे वेढे .



45. उगवला सुर्य मावळली रजनी ,
-------- चे नाव सदैव माझ्य़ा मनी .



46. क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास ,
-------- देतो मी लाडवाचा घास .



47. सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात ,
-------- चे नाव घेतो -------- च्या घरात .



48. श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी ,
-------- च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी .



49. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट ,
-------- बरोबर बांधली जीवनगाठ .



50. मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा ,
-------- चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा .



No comments:
Post a Comment