1. जीवनाला सुगंध असावा चंदनाचा ,
---------- चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा .


2. घराच्या मागे पिकला गहू ,
लग्न नाही झालं तर नाव काय घेऊ .


3. गांधीजी म्हणाले चले जाव घोडा गेला पळून ,
----------- च नाव घेते सर्वांनी पहा वळून .


4. सत्यनारायणाच्या पुढे उदबत्तीचा पुडा ,
---------- च्या नावाचा भरलाय हिरवा चूडा .


5. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ,
--------- चे नाव घेते आता तरी जाऊया घरात .


6. पेणचे पेढे नाशिकची द्राक्षे वसईची केळी ,
केळ्यांची काढली साल ------- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल .


7. वसंत ॠतुत कोकीळा गाते --------- रावांचे नाव ,
मी ----------- राणी घेते .


8. इंग्रजीत आईला म्हणतात मदर वडिलांना म्हणतात फादर ,
---------- रावांच्या नावाने डोक्यावर घेते पदर .


9. चांदीचा निरांजन कापसाची फुलवात ,
----------- च्या नावाची आजपासुन केली सुरूवात .


10. काचेच्या बशीत बदामाचा हलवा ,
--------- चे नाव घेते सासुला बोलवा .



11. सत्यनारायणाच्या पुजेला हळदी कुंकु वाहते वाकुन ,
----------- चे नाव घेते तुमचा मान राखून .


12. महादेवाच्या पिंडीवर द्राक्षाची वेल ,
-------- राव करतात पुजा आणि मी वाहते बेल .


13. महादेवाच्या पिंडीला चौकोन चिरा ---------- ,
राव करतात पुजा आणि मी वाहते हिरा .


14. स्टिलच्या प्लेटीत फनासाचे गरे ------------ राव ,
दिसतात बरे पण नांदवतील तेव्हाच खरे .


15. सहज पडली बाहेर नजर गेली आकशात ,
-------- रावांचा फोटो भारताच्या नकाशात .


16. दया क्षमा शांती हेच माझं माहेर ,
------------ रावांनी केला सौभाग्याचा आहेर .


17. मारुतीच्या देवळात उदबत्तीचा वास ,
---------- भरवते पेढयाचा घास .


18. सत्यनारायण देवा नमस्कार करते तुला ,
---------- नाव घेते अखंड सौभाग्य लाभो मला .


19. मान राखून तुमचा, मैत्रिणींनो घेते मी उखाना ,
पण ……………… रावांचं नाव घ्यायला लागतो मला बाई बहाणा .


20. नणंदा माझ्या बहिणी जावा माझ्या मैत्रिणी, सासरच्या अंगणात फुलली रातराणी ,
------------- रावांचे नाव घेते संसारात आहे मी समाधानी .


21. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान ,
------------ रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान .


22. मनातल्या भावना दिसतात डोळ्यांत ,
मी बघते आरशात तर ---------- रावच दिसतात मला माझ्या डोळ्यांत.


23. मुके झाले शब्द ओठी लज्जेचे बंधन ,
----------- नावाभोवती कशी करू उखाण्याची गुंफण .


24. सागर तेथे सरिता कवी तेथे कविता ,
------------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता .


25. गळ्यात गळसरी नाकात घातली नथ ,
---------- च्या साथीने ओढीन संसाराचा रथ .


26. दिल्ली का कुतूबमिनार, दौलताबाद का चान्दमिनार ,
हैद्राबाद का चारमिनार ------- मिया से मेरे जीवन में सदाबहार .


27. फुलासारखं शील त्याला कीर्तिचा सुगंध ,
---------- चा सहवास हाच माझा आनंद .


28. उगवले अरुण उषेला आली लाली ,
---------- रावांच्या जीवनात मी भाग्यशाली .


29. रत्नजडित सिंहासन मखमली गालिचे, सासुबाईंच्या पोटचे वन्संच्या पाठचे ,
-------- राव झाले आमचे विसरा बरे तुमचे .


30. नजरानजर झाली छोट्याशा बोळात ,
दोघेही हसलो ओठातल्या ओठात .


31. बघता बघता वरमाला पडल्या गळ्यात ,
--------- रावांचं नाव घेते मैत्रिणिच्या घोळक्यात .


32. गजाननाची क्रुपा गुरुचां आशीर्वाद ,
------- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात .


33. आली आली सक्रांत घ्या सौभाग्याचं वाण ,
----- राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण .


34. तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रिणींची साथ ,
संसाराच्या वळणावर मिळाला -------- रावांचा हात .


35. सुखदुःखाच्य़ा ऊनपावसात चालतो संसाराचा खेळ ,
--------- रावांचे नाव घेते ---------- ची वेळ .


36. कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार ,
------- रावांचे नाव घेते कर देवा संसार नौका पार .


37. पती पत्नी असतात सुखदुःखाचे साथी ,
-------- रावांचे नाव घेते आशीर्वाद असु दयावा माथी .


38. कळत नाही माझेच मला आहे स्वप्न कि भास ,
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास .


39. गुलाबाचे फुल गणपतीला वाहीले ,
------ रावांसाठी ------- गाव पाहीले .


40. रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाले मोहीत ,
------- रावांना आयुष्य मागते सासुसास-यासहीत .


41. वन, टु, थ्री ,
------ रावांचे बोलणे एकदमच फ्री .


42. ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे ,
------ रावांचे नाव घेण्यास मागे का हटावे .


43. ------- च्या प्रेमाला जगात नाही तोड ,
परमेश्वराच्या चरणी प्रार्थना शेवट व्हावा गोड .


44. सोन्याचे ताट चांदीची वाटी ,
सात जन्म घेईन मी ------- रावांसाठी .


45. रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा ,
जीवनाचा खेळ समजला ------- रावांमुळेच सारा .


46. चांदीच्या सुटकेस मध्ये शालूची घडी ,
------- ने पिक्चर दाखविला माहेरची साडी .


47. मंगळसुत्राच्या दोन वाटया एका वाटीत सासर दुस-या वाटीत माहेर ,
------- रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर .


48. नंदनवनात फुलली सोन्याची कमळे ,
------ रावांच्यामुळे मला संसाराचा अर्थ कळे .


49. मुळामूठेच्या संगमावर वसले सूंदर पुणे ,
------- रावांच्या संसारात नाही कशाचे उणे .


50. निळया नभावर कर्तुत्वाचा असे रुपेरी ठसा ,
------ रावांसह करीत आहे संसाराचा श्रीगणेशा .


51. श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक ,
------- रावांच्या नावाने बेल वाहिला एकशे एक .


52. इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास ,
------- रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास .


53. विदयेचे माहेरघर आहे म्हणतात पुणे ,
------- रावांच्या संसारात नाही मला उणे .


54. गुलाबाच्य़ा फुलांचा लाजवाब सुगंध ,
------- रावांना केले मी ह्रदयात बंद .


55. तानाजी शिवाजी जिवलग मित्र ,
------- रावांनी आणले माझ्यासाठी मंगळसुत्र .


56. चांगली पुस्तके आहेत माणसाचे मित्र ,
------- रावांच्या सहवासात रंगविले संसाराचे चित्र .


57. ज्ञानदानाने करते मी कर्तव्यपुर्ती ,
------- रावांच्या शब्दांनी मिळते मला स्फुर्ती .


58. गीतात जसा भाव, फुलात तसा गंध ,
------- रावांबरोबर जुळले रेशमी बंध .


59. महादेवाच्या मंदीरात उदबत्तीचा वास ,
------- रावांना घालते करंजीचा घास .


60. श्रावणधारेच्या वर्जवाणीत प्रुथ्वी बनते अंजली ,
------- रावांच्या सहवासात मी तुळस रंगविली .


61. नेत्राचे निरांजन लावते पापणीच्या ताटी ,
------- राव आणि माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी .


62. माप ओलांडून ग्रुहप्रवेश करते ,
------- रावांचे नाव घेऊन सौभाग्य मागते .


63. नीलवर्णी आकाशात लागली चाहूल ,
------- रावांच्या संसारात पडले पहिले पाऊल .


64. सासरचे निरांजन माहेरची फुलवात ,
------- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात .


65. कोल्हापूरच्या देवीपूढे हळदी कुंकवाच्या राशी ,
------- रावांचे नाव घेते --------- च्या बारशाच्या दिवशी .


66. विजेचे वर्तन ढ्ग करती गडगड ,
------- रावांचे नाव घेताना होई माझी गडबड .


67. श्याम सावळा सखा भक्तांचा कैवारी ,
जीवन माझे सुखी ------- रावांच्या संसारी .


68. संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी ,
------- रावांचा उत्कर्ष होवो हेच मागणे हो देवापाशी .


69. निसर्गाला नाही आदि आणि अंत ,
------- राव आहेत मला मनपसंद .


70. सदसदविवेक बुध्दिला असे शिक्षणाचे वरदान ,
------- रावांच्या संसारात देईन सर्वाना मान .



71. वडिलांना पडली होती काळजी कसे मिळेल घर ,
------- रावांसारखे शांत मिळाले वर .



72. शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी ,
------- राव आहेत माझे जीवन साथी .



73. दारी होती विहीर, विहीरीवर होते बारा हंडे ,
बाराहंडयावर बाराकरंडे, बाराकरंडयावर बारा वाती ,
------- राव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती .



74. झुन झुन झुन्यात, बसली मेण्यात ,
कंचोळी अंगात गुलाल भांगात ,
जायफळ वटीत लवंगा दोळे मुठीत ,
हंडयावर परात, परातीत भात ,
भातावर तुप, तुपासारखे रुप ,
रुपासारखा जोडा ------- रावांना म्हणते ,
सारीकामे सोडा अन माहेरी चला .



75. साखरेचे खाणार त्याला देव देणार ,
-------- रावांसाठी आज मी गौरीहर पुजणार .



76. घरोघरी मातीच्या चुली ,
-------- रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली .



77. नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा ,
-------- रावांसह मी बसते जेवायला .



78. वडयाचं तेल वांग्यावर ,
-------- रावांचे नाव आहे माझ्या ओठांवर .



79. ऐकावे जनाचे करावे मनाचे ,
-------- राव आहेत मोठया उदार मनाचे .



80. चंदनाचा पाट आणि चांदीचे ताट ,
-------- रावांसंगे राहण्यात आहे मोठा थाट .



81. वासरात लंगडी गाय शहाणी ,
-------- रावांची झाले आज अर्धांगिनी .



82. चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे ,
-------- रावांचे नी माझे बंधन आहे सात जन्माचे .



83. संसारातील रेशमी शालूवर प्रीतीची लावते फुलवात ,
-------- राव देतात मला सुखदुःखात आधार .



84. तिरंगी ध्वजाला चंदनाची काठी ,
-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती .



85. ह्रदयात असावे प्रेम, प्रेमात असावा त्याग ,
त्यागात असावी निष्ठा, निष्ठेत असावी क्रुती ,
क्रुतीत असावी कला -------- च्या संसारात काय उणे मला .



No comments:
Post a Comment