1. निसर्गावर करु पाहत आहे आजचा मानव मात ,
अर्धांगी म्हणून दिला ------ रावांच्या हाती हात .


2. जीवनाच्या कोंदणात फुलले प्रितीचे पुष्प ,
------- रावांच्या नावाने घेते मी सौभाग्याचा गुच्छ .


3. मावळला सुर्य उगवला शशी ,
------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी .


4. शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज ,
------- रावांचे नाव घेते गौर बसली आज .


5. आदघर माजघर, माजघरांत पलंग, पलंगावर उशी ,
------- रावांच्या जीवावर मी आहे खुशी .


6. शरयु नदीत जन्म झाला मेघदुतांचा ,
------- रावांच्या जीवनात उगम झाला आनंदाचा .


7. माहेरच्या प्रागंणात वेचले ज्ञानकण ,
------- रावांचे नाव घेऊन बांधते कंकण .


8. संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर ,
आयुष्याचा प्रवास करते ------- रावांबरोबर .


9. सांजवात लावतेवेळी होते माहेरची आठवण ,
------- रावांसाठी ------ ची पाठवण .


10. वाडयात सव्वाहात तुळशीचे व्रुदांवन ,
------- रावांचे नाव घेऊन तुमचे करीते आभिनंदन .


11. सुखाच्या शेरी चढताना दुःखाचा नाही लवलेश ,
------- रावांसह करीते ग्रुहप्रवेश .


12. उंबरठयावर पाय दिल्यावर लागली सूखी जीवनाची चाहूल ,
------- रावांचे नाव घेऊन टाकते दिल्याघरी पाऊल .


13. मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला ,
--------- रावांचे गूण पाहून अर्पण केले मला .


14. गीतेतं क्रुष्णाने अर्जुनाला केला उपदेश ,
------- रावांच्या बरोबर करते ग्रुहप्रवेश .


15. चंद्राला पाहून हर्षित होते रोहिणी ,
------- रावांच्या जीवनात होईन मी आदर्श ग्रुहिणी .


16. सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र ,
------- रावांच्या नावाचे बांधते मणीमंगळसुत्र .


17. संस्क्रुत भाषेत नदीला म्हणतात सरिता ,
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता .


18. अम्रुतासाठी समुद्राचे झाले मंथन ,
------- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण .


19. राधेच्या मनात क्रुष्णाचे चिंतन ,
------- रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण .


20. चांदीच्या करंडयाला सोन्याचे झाकण ,
------ रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण .


21. नववधुच्या करि शोभे हिरवे कंकण ,
------ रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण .


22. सूनमूख पाहण्यासाठी आवश्यक असतो आरसा ,
------- रावांना घास घालते अनारसा .


23. राम, लक्ष्मण, हनुमान त्यांचा दास ,
------- रावांसाठी मला निवडलं खास .


24. नागनाथाच्या मंदीरात उदबत्तीचा वास ,
------- रावांना घालते लाडूचा घास .


25. ता-याचं लुकलुकणं चंद्राला आवडलं ,
------- रावांसाठी मला निवडलं .


26. चांदीच्या तबकात मोती होऊन राहण्यापेक्षा चातकाची भागवावी तहान ,
------- राव पती मिळाले म्हणून माझे जीवन झाले महान .


27. सौभाग्यकांक्षिणी कालची झाले सुवासिनी आज ,
------- रावांनी दिला सारा सौभाग्याचा साज .


28. आईनी वाढवलं, वडीलांनी पढवलं ,
------- रावांनी त्यांची होताच सोन्यानं मढवलं .


29. गाण्याच्य़ा मैफलीत पेटीचा सुर ,
------- रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर .


30. सोन्याच्या तारेत गुंफली एकदाणी ,
-------- रावांचे नाव घेते ------- पंतांची तान्ही .


31. लक्ष्मी माते वंदन करते मनी श्रध्देचे बळ ,
------- रावांच्या संसारी दे सम्रुध्दीचे फळ .


32. जलाशयात असते जसे निर्मळ पाणी ,
तशीच मी ------- रावांची सहधर्मचारिणी .


33. कोसळल्या जलधारा, धरा आनंदली रातोरात ,
-------- रावांच्या सहवासात होवो सौख्याची बरसात .


34. संध्याकाळी तूळशीपाशी मंद ज्योत तेवते ,
------- दिवस म्हणून ------- रावांचे नाव घेते .


35. सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश ,
------- राव हेच माझ्या जीविताचे परमेश .


36. सरस्वतीच्या मंदीरात साहित्याच्य़ा राशी ,
------- रावांचे नाव घेते शुभमंगलदिवशी .


37. दोन कुल उद्धरते कन्या एक कुल उद्धरतो पुत्र ,
------- रावांच्या नावाने बांधले मंगळसुत्र .


38. मंगल झाली प्रभात, विहंग उडले गात ,
------- रावांच्या हाती दिला हात .


39. संध्याकाळच्या चंदन गंधात अधिर झाली दिशा ,
-------रावांचे आयुष्य कळीकळीने उमलावे हीच माझी मनिषा .


40. संसार सौख्याची मनामध्ये आस ,
------- रावांना घालते ------ चा घास .


41. राव आमचे मोठे करारी ,
म्हणून तर मी घेऊ शकले उंच भरारी .


42. ज्याचा जसा भाव तशी भावना दिसते ,
------- ची प्रतिमा माझ्या मनी वसते .


43. देवाजवळ सांयकाळी करेन देवाची आरती ,
------- राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी .


44. कपाळावर कुंकु त्याखाली हळद सजते ,
हातावरच्या मेंदीत ------- रावांचे नाव रेखाटते .


45. सुंदर काळेभोर केसात सजते गुलाबाचे फुल ,
------- राव क्षमा करतात माझी प्रत्येक भुल .


46. प्रेम दयावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा ,
------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा .


47. नीलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो ,
------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभो .


48. जाई-जुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा ,
-------- रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वान असावा .


49. आई-वडिल करीत होते काळजी कसे मिळते घर ,
----- रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर .


50. शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा ,
------- रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा .



51. वसंतातील डाळ पन्हं देती थंडावा ,
-------- रावांसह मला आपला आर्शिवाद हवा .



52. श्रीक्रुष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन ,
-------- रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन .



53. जीवन रुपी कांदबरी वाचली दोघांनी ,
-------- रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानी .



54. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला बरवा ,
--------राव बसले पुजेला मी निवडते दुर्वा .



55. असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार ,
-------- राव आहेत माझ्या जीवनाचा आधार .



56. तानसेन मेघ बरसण्यासाठी आळवित असे मेघ मल्हार ,
--------रावांसारखे प्रेमळ पती लाभले मला सहचर .



57. घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस ,
-------- रावांच्या नावाचा संसारावर चढवीन कळस .



58. कुंकू लावते ठळक हळद लावते किंचीत ,
-------- रावांचं नाव घेते हेच माझं संचित .



59. महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड ,
-------- रावांचे बोलणं साखरेहुन गोड .



60. गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा स्वरुपाचा ,
--------रावांचे नाव घेते संसार करेन सुखाचा .



61. रुसलेल्या राधेला क्रुष्ण म्हणतो हास ,
-------- रावांचे नाव घेते आज दिवस आहे खास .



62. शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने ,
-------- रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने .



63. संसाररुपी सागरात उसळल्या लाटा ,
-------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा .



64. एका वाफ्यातील तुळस दुस-या वाफ्यात रुजवली ,
-------- रावांची सारी माणसे मी आपली मानली .



65. श्रीक्रुष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य ,
-------- राव आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य .



66. शिवाजीला जन्म देणारी धन्य जिजाऊ माता ,
-------- रावांचे नाव घेते आपल्या शब्दाकरीता .



67. जीवनात ही घडी अशीच राहू दे ,
-------- रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे .



68. माहेरचे निरांजन सासरची वात ,
-------- रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात .



69. कुलदेवतेला स्मरुन वंदन करते देवाला ,
-------- रावांचे सौभाग्य अखंड दे मला .



70. संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष ,
-------- रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष .



No comments:
Post a Comment